south africa twitter
Sports

Explainer: ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान की दक्षिण आफ्रिका? टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कोणाविरुद्ध भिडणार?

ICC Champions Trophy Semi Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले आहेत. तर उर्वरीत २ संघ कोणते असतील? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. ३ पैकी २ सामने जिंकून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचाही ६ गडी राखून पराभव केला. आता शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. म्हणजे भारतीय संघ सेमीफायनल खेळणार हे तर कन्फर्म आहे. पण कोणत्या संघाविरुद्ध खेळणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

कसं आहे स्पर्धेचं स्वरुप?

भारतीय संघाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, तर भारतीय संघ गुणातालिकेत अव्वल स्थानी पोहचेल. जर हा सामना गमावला, तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी जाईल. स्पर्धेच्या स्वरुपानुसार, ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी असलेला संघ ग्रुप बी मध्ये असलेल्या दुसऱ्या संघाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार. तर ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानी असलेला संघ ग्रुप बी मध्ये असलेल्या पहिल्या संघाविरुद्ध सामना खेळणार.

बुधवारी झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आणि ग्रुप बीचं संपूर्ण समीकरण बिघडलं. या सामन्यानंतर इंग्लंडचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा संघ अजूनही स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीत टीकून आहे.

कोण जाणार सेमीफायनलमध्ये?

जर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने जिंकले, तर दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. जर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं, तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तर अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य हे इंग्लंडच्या भवितव्यावर अवलंबूत राहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT