Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

Box Office Collection: ‘दशावतार’ या रहस्यमय थ्रिलरने बॉक्स ऑफिसवरही आपली पकड अधिक घट्ट केली आहे. बॉलिवूडची मोठी रिलीज ठरलेली ‘जॉली एलएलबी ३’ मात्र आपल्या पहिल्या आठवड्यानंतर गडगडताना दिसत आहे.
Box Office Collection
Box Office CollectionSaam Tv
Published On

Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची चर्चा रंगली आहे – ती म्हणजे ‘दशावतार’. या रहस्यमय थ्रिलरने केवळ प्रेक्षकांना खिळवून ठेवले नाही, तर बॉक्स ऑफिसवरही आपली पकड अधिक घट्ट केली आहे. दोन आठवड्यांचा प्रवास पूर्ण करताना या चित्रपटाने तब्बल १८.४० कोटींचा टप्पा पार केला आहे.

पहिल्या आठवड्यात सुमारे ९.२ कोटींची कमाई करून, दुसऱ्या आठवड्यात ‘दशावतार’ने विकेंडला मोठी कमाई केली आहे. दुसऱ्या शनिवारी (दिवस ९) २.६५ कोटी आणि दुसऱ्या रविवारी (दिवस १०) ३ कोटी इतकी कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड कायम ठेवली. एवढेच नव्हे तर १४ व्या दिवशीही या चित्रपटाने ४० लाखांची कमाई केली. महाराष्ट्रात सरासरी १२.३१% ऑक्युपन्सी नोंदली गेली असून, विशेष म्हणजे रात्रीचे शो अधिक हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत.

Box Office Collection
Gaurav More: फिल्टरपाडा ते आलिशान टॉवर; गौरव मोरेला मिळाली म्हाडाच्या नव्या घराची चावी

दरम्यान, बॉलिवूडची मोठी रिलीज ठरलेली ‘जॉली एलएलबी ३’ मात्र आपल्या पहिल्या आठवड्यानंतर गडगडताना दिसत आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने केवळ २.२७ कोटींची कमाई केली आणि त्याचे एकूण भारतातील कलेक्शन ७२.२७ कोटींवर पोहोचले. सुरुवातीला दमदार ओपनिंग केलेल्या या चित्रपटाची गती मात्र दिवसेंदिवस मंदावली असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादात घट दिसून येत आहे.

Box Office Collection
Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

बॉक्स ऑफिसवरचा हा विरोधाभासी चित्रपटांचा खेळ मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवा आत्मविश्वास देणारा आहे. मर्यादित बजेट व मर्यादित स्क्रिन्सवर रिलीज होऊनही ‘दशावतार’ मोठी रिलीज पेक्षा चांगली कमाई करत आहे. आजवर ‘सैराट’ आणि ‘नटसम्राट’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम केले होते. त्याच रांगेत आता ‘दशावतार’च्या नावाची नोंद झाली आहे यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com