Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

Shantanu Moghe On Priya Marathe: प्रिया मराठे यांच्या निधनानंतर त्यांचे पती शंतनू मोघे यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा एकदा अभिनयविश्वात परतण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्याने एका मुलाखतीत प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला.
Shantanu Moghe On Priya Marathe
Shantanu Moghe On Priya MaratheSaam Tv
Published On

Shantanu Moghe On Priya Marathe: अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टी शोकमग्न झाली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मिरा रोड येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. प्रियाने दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिली होती. मालिकांपासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडलेल्या या अभिनेत्रीने अचानकच जगाचा निरोप घेतल्याने प्रेक्षक, सहकलाकार आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

प्रिया मराठे यांच्या निधनानंतर त्यांचे पती शंतनू मोघे यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा एकदा अभिनयविश्वात परतण्याचा निर्णय घेतला आहे. शंतनू मोघे हे मराठी मालिकांमधील आणि विशेषतः ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आता तो स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Shantanu Moghe On Priya Marathe
Diljit Dosanjh: पहलगाम हल्ल्यापूर्वी माझा चित्रपट बनवण्यात आला...; दिलजीत दोसांझची भारत-पाक सामन्यावर टीका, काय म्हणाला?

‘येड लागल प्रेमाचा’ या मालिकेत शंतनू मोघे मंजिरी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेची ऑफर आल्यानंतर त्यांनी ती स्वीकारायला वेळ लावला नाही. त्यांच्या मते, ही व्यक्तिरेखा काहीशी वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आतापर्यंत त्यांनी शिवछत्रपती, पेशवे किंवा अन्य ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत; परंतु ही भूमिका पूर्णपणे सध्याच्या काळाशी संबंधित असून त्यातून वेगळ्या बाजूचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Shantanu Moghe On Priya Marathe
Bigg Boss 19: सलमान खानचा रिॲलिटी शो वादाच्या भोवऱ्यात; तब्बल २ कोटींचा दंड, काय आहे संपूर्ण प्रकरण?

शंतनू मोघे यावेळी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रियाच्या जाण्यानंतर घरातील वातावरण खूप बदलले आहे. मात्र तिला काम आणि व्यावसायिक जीवन किती प्रिय होते, हे कायम लक्षात ठेवून स्वतःला पुन्हा कामात गुंतवण्याचा निर्णय घेतला. प्रिया नेहमी म्हणायची की आपण अभिनयाला न्याय द्यायला हवा. तिच्या आठवणी मनात ठेवून मी पुन्हा सेटवर परतलो आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com