Gaurav More: फिल्टरपाडा ते आलिशान टॉवर; गौरव मोरेला मिळाली म्हाडाच्या नव्या घराची चावी

Gaurav More New House: विनोदी भूमिकांसाठी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता गौरव मोरे अखेर स्वतःच्या घराचा मालक झाला आहे. फिल्टरपाड्याच्या चाळीतून आलिशान टॉवरमध्ये जाण्याचे त्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.
Gaurav More New House
Gaurav More New HouseSaam Tv
Published On

Gaurav More New House: विनोदी भूमिकांसाठी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता गौरव मोरे अखेर स्वतःच्या घराचा मालक झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय शोजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरवने आपल्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. आता त्याच्या आयुष्यातील आणखी एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. फिल्टरपाड्याच्या चाळीतून आलिशान टॉवरमध्ये जाण्याचे त्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

म्हाडाच्या लॉटरीत मिळाले घर

गेल्या वर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,०३० घरांसाठी सोडत काढली होती. या लॉटरीत गौरवने कलाकार कोट्यातून अर्ज दाखल केला होता. सोडतीत तो भाग्यवान ठरला आणि पवई येथील घर त्याच्या नावावर लागले. इमारत बांधकामाधीन असल्यामुळे आणि ओसी (Occupancy Certificate) मिळण्यात विलंब झाल्याने त्याला घराच्या चाव्यांसाठी तब्बल एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अखेर आता त्याला घराची चावी मिळाली असून त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Gaurav More New House
Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

संघर्षातून उभी राहिलेली ओळख

फिल्टरपाड्याच्या साध्या चाळीत वाढलेला गौरव मोरे आज मराठी मनोरंजन विश्वातील ओळखीचे नाव बनला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या त्याच्या भूमिकांनी घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. आयुष्यातील अनेक संघर्षांनंतर आज त्याने मिळवलेले हे घर त्याच्या मेहनतीची साक्ष आहे. "चाळीतून टॉवरमध्ये" हा त्याच्या जीवनप्रवासाचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Gaurav More New House
Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

कलाकारांसाठी नवा उत्साह

गौरवसोबतच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिलाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळाले होते. गोरेगाव येथे तिच्या घराच्या चाव्या देखील नुकत्याच तिला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. कलाक्षेत्रात झटणाऱ्या अनेक तरुण कलाकारांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. मेहनत, चिकाटी आणि संधी मिळाली तर स्वप्न साकार होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com