australian cricket team
australian cricket team  saam tv news
क्रीडा | IPL

AUS vs WI: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कहर! सव्वा दोन दिवसात वेस्टइंडिजचा गेम ओव्हर;मालिकेत १-० ची आघाडी

Ankush Dhavre

Australia vs West Indies 1st Test:

ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ २६ धावांचं आव्हान मिळालं होतं.

या आव्हानाचा सहज पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ९ गडी बाद केले.

ट्रेविस हेड आणि जोश हेजलवूड हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले आहेत. हेडने फलंदाजीत बहुमूल्य योगदान दिलं. तर गोलंदाजीत हेजलवूडने अप्रतिम कामगिरी केली. ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी ट्रेविस हेडने संघासाठी शतक झळकावलं.

त्याने १३४ चेंडूंचा सामना करत ११९ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. तर गोलंदाजी करताना जोश हेजलवूडने सर्वाधिक ९ गडी बाद केले. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी ४-४ गडी बाद केले. तर मिचेल स्टार्क आणि नाथन लायनने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. वेस्टइंडिजकडून पहिल्या डावात फलंदाजी करतानात मॅकेंजीने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर जोसेफने ३६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय....

ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना १३४ धावा चोपल्या. वेस्टइंडिजकडून गोलंदाजी करताना शमार जोसेफने सर्वाधिक ५ गडी बाद केले. वेस्टइंडिजचा दुसरा डाव अवघ्या १२० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ २६ धावांची गरज होती. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT