पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मोठा धक्का बसलाय. चोरट्यांनी वॉर्नरची बॅकपॅक पळवलीय. वॉर्नरने एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिलीय. चोरांना भावनिक आवाहन करत बॅकपॅक परत द्या असं म्हटलंय. (Latest News)
सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत वॉर्नरने बॅग परत करण्याची विनंती केलीय. वॉर्नरने भावनिक आवाहन करताना म्हटले, "दुर्दैवाने कोणीतरी माझी बॅकपॅक गायब केलीय. त्यामध्ये महत्त्वाचे साहित्य आहे. त्यात माझ्या मुलींच्या भेटवस्तूही ठेवल्या होत्या. माझी बॅगी ग्रीन कॅपही या बॅकपॅकमध्ये होती. याची चोरी होणं हे माझ्यासाठी भावनिक आहे.
ही गोष्ट मला माझ्या हातात परत घ्यायला आवडेल. मला हे घालून मैदानात जायचे आहे. ज्याने कोणी ही बॅग नेली आहे त्याला सांगू विनंती करतो की, तुम्हाला खरोखर बॅकपॅक हवी असल्यास मला तसे सांगा. माझ्याकडे एक अतिरिक्त आहे, जी मी नक्की देईन. तुम्ही माझी बॅगी ग्रीन कॅप परत केल्यास मी तुम्हाला बॅकपॅक आनंदाने देईन.", असं वॉर्नरने म्हटलंय.
नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
मुलींच्या भेटवस्तू असलेली बॅकपॅक चोरी झाल्यानंतर भावनिक झालेल्या वॉर्नरची अनेकांनी खिल्ली उडवली. एका युझरने वॉर्नरची पोस्ट खोटं म्हणतं त्याची खिल्ली उडवली आहे. वॉर्नर हा स्टोरी मेकर आहे. तो स्वंयपाक कसा करायचा हे त्याला माहितीये, असं म्हटलंय. तर एका चाहत्याने म्हटलं की, आशा व्यक्त करतो की तुम्हाला तुमची बॅगपॅक परत मिळेल. परंतु ती बॅग काही वेळासाठी एडव्हेंचर करण्यास गेली असेल.
वॉर्नरची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती
डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने(Australia) विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. वॉर्नरने आपल्या करिअरमध्ये १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिलीय. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्यात. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २२ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.