AUS vs NZ World Cup Saam Tv
Sports

AUS vs NZ World Cup: ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; न्यूझीलंडच्या संघासमोर ३८९ धावांचे लक्ष्य

World Cup: धरमशाला येथील स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात क्रिकेट सामना होत आहे.

Bharat Jadhav

Australia vs New Zealand World Cup:

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कपचा २७ वा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभा केलाय. न्यूझीलंडच्या संघासमोर कांगारूच्या संघाने ३८९ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. (Latest News)

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३८८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड याने ८१ धावा केल्या. तर डेविड वॉर्नर १०९ शतक करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. या दोघांच्या धावसंख्येच्या बळावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३८८ धावावर मजल मारली. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर आणि हेड यांनी १७५ धावांची भागीदारी केली. संघाने २०० धावांचा पल्ला गाठला तेव्हा या दोघांची विकेट गेली. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

मिचेल मार्शनं ३६ धावा केल्या तर मॅक्सवेलने २४ चेंडूमध्ये ४१ धावा केल्या. तर स्मिथ आणि लाबुशेन या दोघांनी १८-१८ धावा केल्या. तर जोश इंग्लिसने ३८ आणि पॅट कमिन्सने ३७ धावा केल्या. या सर्वांच्या भागीदारीने संघाने न्यूझीलंडच्या संघाला ३८९ धावांचे आव्हान दिले. दरम्यान न्यूझीलंडचे गोलंदाज ट्रेट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सने ३- ३ विकेट घेतल्या. तर मेचली सॅटनरने २ विकेट घेतल्या. तर मॅट हेनरी आणि जेम्स नीशमने एक-एक गडी बाद केलेत.

उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.मागील सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला भारताने पराभूत केलं होतं. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सुरुवातीला दोनदा पराभव झाला होता. मागील तीन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवत आपला फॉर्म परत मिळवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT