David Warner Icc Twitter
Sports

David Warner Record: शतक हुकलं तरीदेखील विराटला मागे सोडलं, वॉर्नरच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद

David Warner Record: या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने विराटला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

David Warner Record :

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २७ व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. धरमशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८१ धावांची खेळी केली. त्याचं शतक हुकलं मात्र त्याने मोठ्या विक्रमात विराट कोहलीला मागे सोडलं आहे.

डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंडविरूद्ध सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये विराटला मागे सोडलं आहे. या डावात त्याने ६५ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चार चौकार आणि पाच षटकार मारले आहेत.

डेव्हिड वॉर्नर जेव्हा या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी त्याच्या नावे २३ डावांत १३२४ धावांची नोंद होती. तर विराट कोहलीने ३१ डावांत १३८४ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने २८ चेंडूंमध्ये ५० धावांचा पल्ला गाठताच विराटचा रेकॉर्ड मोडून काढला.

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर,रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

सचिन तेंडुलकर (भारत)- २२७८ धावा

रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)- १७४३ धावा

कुमार संगकारा ( श्रीलंका)- १५३२ धावा

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - १४०५ धावा

विराट कोहली (भारत)- १३८४ धावा

ऑस्ट्रेलियाने केल्या ३८८ धावा...

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३८८ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ८१ धावा चोपल्या. शेवटी ग्लेन मॅक्सवेलने ४१, जोस इंग्लिसने ३८ आणि पॅट कमिन्सने ३७ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT