Cricketer Retirement  x
Sports

Cricketer Retirement : आशिया कप २०२५ आधी पाकिस्तानला धक्का, क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

Asif Ali Cricketer Retirement : पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

Yash Shirke

  • पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

  • ३३ वर्षीय आसिफ अलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

  • पाकिस्तानसाठी ७९ सामने खेळलेल्या आसिफ अलीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये खेळला होता.

Cricket : आशिया कप २०२५ ला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमधून मोठी बातमी समोर आली आहे. ३३ वर्षीय स्फोटक फलंदाज आसिफ अलीने निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले. आसिफ अली काही काळापासून पाकिस्तान संघाबाहेर होता.

आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पाकिस्तानची जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांकडून क्रिकेटच्या मैदानावर मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे, असा मजकूर आसिफ अलीने सोशल मीडिया पोस्टवर लिहिला आहे.

२०१८ मध्ये आसिफ अली यांनी पाकिस्तान क्रिकेट संघात पदार्पण केले होते. सुरुवातीला टी-२० फॉरमॅट आणि त्यानंतर दोन महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केला. सुरुवातीला काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. पण सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. मागील काही काळापासून तो पाकिस्तानच्या संघाबाहेर होता. संघात पुनरागमन करण्यासाठी आसिफ अली प्रयत्न करत होता.

आसिफ अलीने पाकिस्तानसाठी एकूण ७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ५८ टी-२० सामन्यांमध्ये आसिफ अलीने १५ च्या सरासरीने आणि १३३ च्या स्ट्राईक रेटने ५७७ धावा केल्या. २१ वनडे सामन्यांमध्ये त्याने २५ च्या सरासरीने ३८२ धावा केल्या आहेत. त्याने एप्रिल २०२२ मध्ये शेवटचा वनडे आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळला होता.

आशिया कपमधील कामगिरी

२०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये आसिफ अलीला पाकिस्तान संघात संधी मिळाली होती. अफगाणिस्तानच्या सामन्यामध्ये त्याने चांगला खेळ केला. पण या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सामन्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही. भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये आसिफ अलीने निराशाजनक खेळ केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT