ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चिंचेच लोणचे हे आंबट गोड तिखट चवीचं पारंपारिक लोणचे आहे. चपाती, भाकरी, पराठा आणि भात या सोबत हे लोणचे चांगले लागते.
सोललेली पिकलेली चिंच, गूळ, चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरे पुड, धणे पुड, मोहरी, मेथी, हिंग आणि तेल इ. साहित्य लागते.
चिंच कोमट पाण्यात ३० मिनिटे भिजवा. नंतर हाताने त्याच्या बिया काढून चिंत मऊ करुन घ्या. चिंचेचा फक्त गर वापरावा त्यामुळे लोणचे चविष्ट लागते.
गूळ किसून घ्या किंवा बारिक करा. आता चिंचेच्या गरात किसलेला गूळ टाक. त्यात मीठ, लाल तिखट, धणे पुड आणि जिरे पुड टाकून सर्व मिश्रण एकसारखे मिक्स करा.
कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी व हिंग घालून फोडणी द्या. हि फोडणी थंड झाल्यावर तयार केलेल्या मिश्रणात टाका.
लोणच चाखून पाहणे, आंबटपणा जास्त वाटल्यास थोडा गूळ टाका, याउलट जर गोडी जास्त वाटली तर चिंच किंवा मीठ घालू शकता. आता चिंचेचे लोणचे तयार आहे.
स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत हे लोणचे भरुन ठेवा. लोणचे बरणीत भरल्यानंतर त्यावर वरुन तेल सोडा म्हणजे लोणचे खराब होणार नाही. लोणचे काढताना नेहमी कोरडा चमचा वारपावा.
हे चिंचेचे लोणचे साधारण 2 ते 3 महिने टिकते. पोळी, पराठा, भाकरी, वरण-भात किंवा स्नॅक्ससोबत या लोणच्याची चव अप्रतिम लागते.