ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेरु हे एक लोकप्रिय फळ आहे. पेरुपासून आंबट गोड चटणीसुध्दा बनवली जाते. कमी वेळात पटकन तयार होणारी हि हेल्दी चटणी आहे.
पेरु हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते . पेरुमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन c आणि अॅंटिऑक्सिडंट्स असतात. तसेच पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते.
१ मोठा पेरु, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ वाटी कोथिंबीर, लसूण, जीरे, साखर किंवा गूळ, लिंबाचा रस, मोहरी, कढिपत्ता, हळद आणि हिंग इ. साहित्य लागते.
पेरु स्वच्छ धुवून घ्या. पेरु मधील आतल्या कडक बिया काढून टाका. पेरुचे लहान तुकडे करुन घ्या. तुकडे केल्यास पेरु मिक्सरमध्ये मऊ वाटून घेता येतो.
मिक्सरमध्ये पेरुचे तुकडे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि मीठ टाका. आता हे सर्व साहित्य थोडे पाणी टाकून जाडसर किंवा तुम्हाला हवे तसे वाटून घ्या.
चटणी थोडी चाखून बघा. आंबटपणा कमी वाटत असेल तर थोडा लिंबाचा रस टाका किंवा खूप आंबटपणा वाटल्यास साखर किंवा गूळ टाका.
एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी ,कढिपत्ता, हिंग आणि हळद घाला. हि तयार केलेली फोडणी चटणीवर ओता. यामुळे चटणीला सुगंध आणि चवही येते. आता चटणी तयार आहे.
हि चटणी तुम्ही चपाती, भाजी, भाकरी, पराठा, डोसा किंवा स्नॅक्ससोबत खाऊ शकता. टिफिनसाठीही ही चटणी उत्तम पर्याय आहे.
ही चटणी फ्रिजमध्ये १ ते २ दिवस टिकते. ताजी चटणी खाल्ल्यास चव हि लागते. तसेच नेहमी पिकलेला पण फार मऊ नसलेला पेरू वापरा.