ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुळ चिंचेची चटणी ही भारतीय पदार्थांमधील एक लोकप्रिय साईड डिश आहे जी आंबट गोड पध्दतीने बनवली जाते.
चिंच, गुळ, जीरे, बडीसोप, काळे मीठ, लाल मिरची पावडर आणि पाणी
चिंच पाण्यात भिजत ठेवणे. चिंच पाण्यात चांगली भिजल्यावर चिंचेचा रस काढून घेणे.
गुळ सुध्दा पाण्यात भिजत ठेवणे. थोड्यावेळानी गुळाचा रस काढून घेणे.
एक पॅन घ्या. त्या पॅनमध्ये चिंचेचा रस, गुळाचा रस आणि बाकी सगळे मसाले टाकून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
हे सर्व तयार केले मिश्रण जाड होईपर्यंत शिजवा आणि आधून-मधून चटणीला चमच्याने हलवत राहा जेणेकरुन मिश्रण पॅनला चिकटणार नाही. आता चटणी तयार आहे.
चटणी थंड झाल्यावर ती एका एअरटाइट जापमध्ये भरुन ठेवा जेणेकरून चटणी दिर्घकाळ टिकून राहिल.
समोसा, चाट आणि पकोड्यांसोबत गुळ चिंचेची चटणी खाण्याचा आनंद घ्या.