Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

पांढरे किंवा काळे तिळ,  ५ ते ६ पाकळ्या लसूण, २ ते ३ सुक्या लाल मिरच्या, जीरे, मसाला (जास्त तिखट हवे असल्यास) आणि चवीनुसार मीठ.

Tilachi Chutney | GOOGLE

तिळ भाजून घेणे

तिळ मंद आचेवर हलक्या हाताने भाजून घ्या. तिळाचा सुगंध यायला लागल्यावर गॅस बंद करा.

Tilachi Chutney | GOOGLE

मिरच्या आणि लसूण भाजणे

त्याच पॅनमध्ये लाल मिरच्या आणि लसूण १-२ मिनिटे भाजून घ्या. त्याच पॅनमध्ये भाजल्यामुळे तिळाचा सुगंध येतो आणि यामुळे चटणीला मस्त चव येते.

Tilachi Chutney | GOOGLE

सर्व साहित्य एकत्र

मिक्सरमध्ये भाजलेले तिळ , मिरच्या, लसूण, जीरे आणि मीठ टाकून वाटून घ्या.

Tilachi Chutney | GOOGLE

बारीक वाटणे

सगळे साहित्य एकत्र ड्राय ग्राईंड करा.चटणी पूर्ण बारीक किंवा मध्यम प्रमाणात तुमच्या आवडीनुसार वाटा.

Tilachi Chutney | GOOGLE

चाखून पाहणे

मीठ कमी असल्याने तुमच्या अंदाजे पुन्हा थोडे टाकावे.

Tilachi Chutney | GOOGLE

सर्व्ह करणे

तिळाची चटणी भाकरी किंवा चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता.

Tilachi Chutney | GOOGLE

स्टोरेज टिप

चटणी एअरटाइट डब्यात भरून १० ते १५ दिवस सहज टिकते. तसेच फ्रीजमध्ये ठेवल्यास अजून जास्त दिवस टिकते.

Tilachi Chutney | GOOGLE

Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

Boiled Potato | GOOGLE
येथे क्लिक करा