asian games 2023 rutuja bhosle and rohan bopanna duo won gold in mixed doubles tennis Twitter
Sports

Asian Games 2023: मराठमोळ्या ऋतुजाची सुवर्ण कामगिरी; रोहन बोपन्नासोबत मिक्स डबल्समध्ये पटकावलं गोल्ड मेडल

Asian Games 2023 Day 7 Live: ऋतुजा भोसले आणि रोहन बोपन्नाने मिळून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू जोरदार कामगिरी करताना दिसून येत आहेत . या स्पर्धेतील सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

भारताकडून रोहन बोपन्ना आणि मराठमोळ्या ऋतुजा भोसले या जोडीने मिक्स डबल्स टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. या विजयासह भारतीय २००२ पासून विजयाची साखळी सुरु ठेवली आहे.

या दोघांनी अंतिम फेरीत चीनी ताईपेच्या सुंग हाओ आणि एन शुओच्या जोडीवर २-६,६-३ (१०-४) ने विजय मिळवला. यापूर्वी रामकुमार रामनाथन आणि साकेत माइसेनी यांनी भारताला रौप्यपदक जिंकून दिलं होतं.( Latest sports updates)

रोहन बोपन्ना आणि ऋतुजाने या सामन्यात संथ सुरुवात केली होती. त्यामुळे या जोडीला पहिला सेट २-६ ने गमवावा लागला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये या जोडीने दमदार कमबॅक केलं.

दुसऱ्या सेटमध्ये चीनी ताईपेच्या खेळाडूंवर हल्लाबोल करत या जोडीने ६-३ ने विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये सुपर टाय-ब्रेक झाला. त्यानंतर रोहन बोपन्ना आणि ऋतुजाच्या जोडीने १०-४ ने बाजी मारत विजय मिळवला. हे या स्पर्धेतील भारताच ९ वे सुवर्णपदक ठरले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत हे रोहन बोपन्नाचे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. त्याने २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेत दिविज शरणसोबत मेन्स डबल्समध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यावेळी ऋतुजा भोसलेची साथ मिळाली. दोघांनी या सामन्यात दमदार खेळ केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

SCROLL FOR NEXT