asian games 2023 india won gold in mens trap team event kynan chenai zoravar singh prithviraj tondaiman  Twitter
Sports

Asian Games 2023: नेमबाजीत भारतीय नेमबाजांचा गोल्डवर निशाणा! मेन्स ट्रॅप टीम शूटिंग इव्हेंटमध्ये फडकवला तिरंगा

Asian Games 2023,Day 8 Live: भारतीय खेळाडूंना शुटिंगमध्ये घवघवीत यश मिळालं आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Live, Mens Trap Team Event:

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. स्पर्धेच्या आठव्या दिवशीही नेमबाजांनी भारताला पदक जिंकून दिलं आहे.

भारतीय नेमबाज पृथ्वीराज टोंडीमन, के चेनाई आणि जोरावर सिंग यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला सुवर्णपदक मिळालं आहे.

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेतील हे भारताचे नेमबाजीतील सातवे सुवर्णपदक आहे. पृथ्वीराज टोंडीमन, के चेनाई आणि जोरावर सिंग यांनी मेन्स टीम ट्रॅप शूटिंग इव्हेंटमध्ये हे पदक पटकावलं आहे. तर भारतीय महिला खेळाडूंनी देखील या इव्हेंटमध्ये बाजी मारली आहे.

मनीषा किर, राजेश्वरी कुमारी आणि प्रीती रजकने वुमेन्स टीम ट्रॅप शूटिंग इव्हेंटमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून दिलं आहे. आतापर्यंत भारताने या स्पर्धेत एकूण ४१ पदकांची कमाई केली आहे. ज्यात ११ सुवर्णपदकांचा समावेश आहे. (Latest sports updates)

नेमबाजीत भारतीय खेळाडूंचा बोलबाला..

भारताकडून रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य तोमर आणि दिव्यांश पवारने १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं.

तर रिदम सांगवान, ईशा सिंग आणि मनू भास्करने २५ मीटर पिस्तूल टीम इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. त्यानंतर सिफ्त कौरने वुमेन्स ५० मीटर रायफल ३ पोझिशन इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT