Asian Games 2023 day 6 live palak won gold and isha singh won silver in Women's 10m Air Pistol Twitter
Sports

Asian Games 2023: महिला नेमबाजांचा सुवर्णवेध सुरूच! १० मीटर पिस्तूल स्पर्धेत पलकला गोल्ड तर ईशाला सिल्वर मेडल

Asian Games 2023 Day 6 LIVE: सहाव्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंचा दबदबा सुरूच आहे.

Ankush Dhavre

Asian Games 2023 Day 6 LIVE:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा सुरूच आहे. भारतीय संघाने सहाव्या दिवसाची देखील दमदार सुरूवात केली आहे. स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकांच्या यादीत भर घातली आहे.

१० मीटर पिस्तूल प्रकारात महिला खेळाडू पलक, दिव्या सुब्बाराजू थडिगोल आणि ईशा सिंगने रौप्यपदकाला गवसणी घातली. त्यानंतर ५० मीटर रायफल ३ पी पुरूषांच्या क्रीडा प्रकारात १७६९ गुणांसह भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात स्वप्निल सुरेश कुसाले, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि सुरेश कुसाले यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. (Latest sports updates)

भारतीय महिला नेमबाज चमकले..

महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी गेल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकारात भारतीय नेमबाज पलकने २४२.१ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहेे. तर ईशा सिगंने २३९.७ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताची पदकांची संख्या..

एकुण पदकं- ३०

सुवर्ण- ८

रौप्य -११

कांस्य- ११

सुवर्णपदक- ५० मीटर रायफल ३ पी (पुरुष,सांघिक)

रौप्यपदक - १० मीटर एयर पिस्तूल (महिला, सांघिक)

रौप्यपदक- टेनिस पुरुष दुहेरी

सुवर्णपदक - पलक ( १० मीटर एयर पिस्तूल, महिला)

रौप्यपदक- ईशा सिंग (१० मीटर एयर पिस्तूल)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT