indian hockey team twitter
क्रीडा

Asian Champions Trophy: पाकिस्ताननंतर आता चीनचा नंबर, जेतेपदासाठी भारत सज्ज! केव्हा, कुठे अन् कधी रंगणार सामना?

Asian Champions Trophy 2024 Final Live Streaming And Match Details: आज भारत आणि चीन या दोन्ही संघांमध्ये एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना होणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा जेतेपदासाठीचा सामना चीनसोबत होणार आहे. यापूर्वी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला.

कोरियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारत फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान जेतेपदासाठी भारत आणि चीन हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार? जाणून घ्या.

केव्हा होणार एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेची फायनल?

भारत आणि चीन यांच्यातील एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेची फायनल आज होणार आहे.

कुठे खेळला जाणार एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना?

भारत आणि चीन यांच्यातील फायनलचा सामना हुलुनबूइरच्या मोकी ट्रेनिंग कॅम्पमध्ये खेळला जाणार आहे.

कुठे पाहता येईल लाईव्ह?

भारत आणि चीन यांच्यात होणारा फायनलचा सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल.

इथे पाहा Live Streaming

या सामन्याचे Live Streaming तुम्हाला सोनी लिव अॅपवर पाहता येईल.

किती वाजता सुरु होईल सामना

भारत आणि चीन यांच्यातील फायनलच्या सामन्याला दुपारी ३:३० वाजता सुरुवात होईल.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारत आणि चीन यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघ आघाडीवर आहे. दोन्ही संघ आतापर्यंत ६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारताने ५ वेळेस बाजी मारली आहे. तर चीनला केवळ १ सामना जिंकता आला आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत २०२३, २०१६, २०१४ आणि २०१३ मध्ये आमनेसामने आले होते. दोन्ही संघांची आकडेवारी पाहिली, तर भारतीय संघ आघाडीवर आहे. भारतीय संघ हाच रेकॉर्ड कायम ठेवणार का,हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Election : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप, ५२ पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपला जाहीर पाठिंबा!

SCROLL FOR NEXT