Asia Cup 2025 Team India Fitness Update saam tv
Sports

Asia Cup 2025 India Squad: श्रेयस अय्यर पास; हार्दिक पांड्या वेटिंगवर तर सूर्या दादाबाबत सस्पेन्स

Asia Cup 2025 Team India Fitness Update: आशिया कप २०२५ फक्त एक महिना दूर आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस चाचणी केली जाणार आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या फिटनेस टेस्ट अजून झाली नाहीये.

Bharat Jadhav

  • आशिया कप २०२५ सुरू होण्यास फक्त एक महिना बाकी

  • भारतीय संघ रणनीती आणि फिटनेसवर भर देत आहे

  • हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवची फिटनेस चाचणी

  • श्रेयस अय्यर पास, पांड्या आणि सूर्यकुमारबाबत निर्णय बाकी

आशिया कप २०२५ सुरू होण्यास आता फक्त एक महिना उरला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारीला लागलाय. निवड समिती खेळाडूंच्या फीटनेसवर लक्ष ठेवून आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि टीम व्यवस्थापन फक्त नेट प्रॅक्टिससह खेळाच्या रणनीतीवरच नव्हे, तर खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टवरही लक्ष ठेवत आहे. हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसारख्या महत्वाच्या खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येत आहे. आत श्रेयस अय्यर पास झालाय पण पांड्या आणि सूर्यकुमारबाबत अजून निर्णय झाला नाहीये.

श्रेयस अय्यरने आपला फिटनेस टेस्ट यशस्वीपणे पूर्ण केलीय. २७ ते २९ जुलैदरम्यान झालेल्या या टेस्टमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सला मोठा दिलासा मिळालाय. गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला नाही. पण आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे त्याच्या आशिया कप संघात परत येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

मात्र सूर्यकुमार यादवबाबत निर्णय झाला नाहीये. जून महिन्याच्या सुरवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो अद्याप फिट नाहीये. आठवडाभराचा कालावधी त्याला उपचार आणि रिकव्हर होण्यासाठी लागणार आहे. सध्या तो NCA मधील वैद्यकीय आणि फिजिओथेरपी टीमच्या देखरेखीखाली आहे.

तर हार्दिक पांड्यासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे आहेत. त्याची फिटनेस टेस्ट आज आणि उद्या एनसीए बंगळुरूमध्ये होणार आहे. हार्दिक एनसीएमध्ये दाखल झाला असून त्याने सोशल मीडियावरही काही फोटो पोस्ट करत ही माहिती दिलीय. आशिया कप २०२५ ची सुरुवात ९ सप्टेंबरपासून युएईत होणार असून ही स्पर्धा २१ दिवस चालणार आहे.

सूर्यकुमार यादव याचा महारेकॉर्ड ब्रेक

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर टीम डेव्हिडने सूर्यकुमार यादवचा महारेकॉर्ड ब्रेक केलाय. डेव्हिडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यातील पहिल्या डावात स्फोटक खेळी केली. डेव्हिडने ५२ बॉलमध्ये ८ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. डेव्हिडने १५९.६२ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. डेव्हिडच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७९ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दक्षिण आफ्रिकेला १६१ धावाच करता आल्या. हा सामना ऑस्ट्रेलियानं १७ धावांनी जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT