आशिया कप २०२५ च्या सुपर ४ टप्प्यातील पाचवा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झाला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आलेत. दरम्यान सुपर ४ टप्प्यात बांगलादेशला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
त्याचमुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती, परंतु त्यांच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी त्यांना पुनरागमनाकडे नेले. नंतर त्यांच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. पाकिस्तानने हा सामना ११ धावांनी जिंकला. (Asia Cup 2025 Final: India Vs Pakistan After Bangladesh Knocked Out)
पाकिस्तानकडून १३५ धावांचे आव्हान मिळाल्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात संथ राहिली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्यांना मोठे फटके मारण्यास संधी दिली नाही. बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव ठेवण्यास पाकिस्तानचे गोलंदाज यशस्वी राहिले. १३६ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच षटकात परवेझ हुसेन इमॉनला बाद केले.
त्यानंतर तौहीद हृदयॉयला बाद करून संघाला दुसरा विजय मिळवून दिला. त्यानंतर हरिस रौफने बांगलादेशला तिसरा धक्का दिला. या खराब सुरुवातीमुळे बांगलादेशचा डाव डळमळीत झाला. कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. ६३ धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. सुरुवातीच्या पाच फलंदाजांपैकी एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. याचाच परिणाम बांगलादेशला २० षटकांत ९ बाद फक्त १२९ धावा करता आल्या.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३५ धावा केल्या. मोहम्मद हरिसने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर मोहम्मद नवाजने २५ धावांची खेळी केली. शाहीन शाह आफ्रिदीनेही १३ चेंडूत १९ धावा केल्या.
त्यानंतर फहीम अशरफने १४ धावा करून संघाला १३५ ची धावसंख्या गाठण्यास मदत केली. बांगलादेशकडून तस्किन अहमदने चांगली गोलंदाजी केली, त्याने ३ विकेट्स घेतल्या. रिशाद हुसेननेही चांगली गोलंदाजी केली. त्याने दोन विकेट्स घेतल्या. मेहेदी हसननेही दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.