Asia Cup 2025 x
Sports

Asia Cup 2025 : आशिया चषकाचा थरार, भारताचा पहिला सामना कधी अन् कुठे? प्लेईंग ११, सर्व माहिती एका क्लिकवर

Asia Cup Schedule : अवघ्या काही तासांमध्ये आशिया कप २०२५ सुरु होणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ संघ खेळणार आहेत. आशिया कप २०२५ ची संपूर्ण, सविस्तर माहिती वाचा...

Yash Shirke

  • आशिया कप २०२५ मध्ये पहिल्यांदाच ८ संघ सहभागी होणार असून स्पर्धेला उद्या सुरुवात.

  • भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध, तर १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला.

  • दुबई व अबू धाबीमध्ये सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना २८ सप्टेंबरला रंगणार.

Asia Cup : आशिया कप सुरु व्हायला फक्त काही तास उरले आहेत. आशिया कप २०२५ चा पहिला सामना ९ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे दोन संघ पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. पहिल्यांदाच या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. भारताचा संघ गतविजेता म्हणून स्पर्धेत सहभागी होणार आहे.

आशिया कप स्पर्धेमध्ये ८ देशांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई यांना ग्रुप ए आणि श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांना ग्रुप बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत आशिया कपमध्ये पहिला सामना १० सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबत खेळणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होईल. ग्रुप ए मधील शेवटचा सामना भारत ओमानचा सामना करेल.

१० सप्टेंबर - भारत विरुद्ध यूएई

१४ सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान

१९ सप्टेंबर - भारत विरुद्ध ओमान

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ १८ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने दहा सामने जिंकले आहेत. पाकिस्तान ६ वेळा विजयी झाला होता. दोन सामने अनिर्णीत ठरले होते.

भारतीय संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती

(भारताची संभाव्य प्लेईंग ११ - सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, रिंकू सिंह, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह)

पाकिस्तान संघ -

सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रम, साहिबजादा फरहान, सय्यम अयुब, सलमान मिर्झा, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मौहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह आफ्रिदी, सुईम आफ्रिदी

यूएई संघ -

मोहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतिउल्ला खान, मोहम्मद फारूख, मोहम्मद जवादुल्ला, मोहम्मद जौहेब, राहुल खान, रोहिद खान, मोहम्मद झोहैब, राहुल खान, चौपरा सिंह, हर्षित कौशिक

ओमान संघ -

जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफियान युसूफ, आशिष ओडेदरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान मोहम्मद, आर्यन बिश्त, करन सोनावले, जिकिरिया इस्लाम, हसनैन शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव

आशिया कप ग्रुप्स सामने -

  • ९ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग - रात्री ८ - अबू धाबी

  • १० सप्टेंबर: भारत विरुद्ध यूएई - रात्री ८ वाजता - दुबई

  • ११ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग - रात्री ८ वाजता - अबू धाबी

  • १२ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध ओमान - रात्री ८ वाजता - दुबई

  • १३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - रात्री ८ वाजता - अबू धाबी

  • १४ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान - रात्री ८ वाजता - दुबई

  • १५ सप्टेंबर: यूएई विरुद्ध ओमान - संध्याकाळी ५.३० - अबू धाबी

  • १५ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग - रात्री ८ वाजता - दुबई

  • १६ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - रात्री ८ वाजता - अबू धाबी

  • १७ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध यूएई - रात्री ८ वाजता - दुबई

  • १८ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - रात्री ८ वाजता - अबू धाबी

  • १९ सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान - रात्री ८ वाजता - अबू धाबी

सुपर-4 फेरीचे सामने

  • २० सप्टेंबर: B1 वि B2 - रात्री ८ - दुबई

  • २१ सप्टेंबर: A1 वि A2 - रात्री ८ वाजता - दुबई

  • २२ सप्टेंबर: A2 विरुद्ध B1 - रात्री ८ वाजता - अबू धाबी

  • २४ सप्टेंबर: A1 विरुद्ध B2 - रात्री ८ वाजता - दुबई

  • २५ सप्टेंबर: A2 विरुद्ध B2 - रात्री ८ वाजता - दुबई

  • २६ सप्टेंबर: A1 विरुद्ध B1 - रात्री ८ वाजता - दुबई

  • अंतिम सामना: २८ सप्टेंबर - रात्री ८ वाजता - दुबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT