
भारताने आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलं.
भारताने अंतिम सामन्यात फ्रान्सवर २३५-२३३ असा विजय मिळवला.
ही ऐतिहासिक कामगिरी भारताच्या पुरुष कंपाऊंड संघाने केली.
भारतीय तिरंदाजांनी आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत देशाचा झेंडा अभिमानाने फडकावलाय. तिरंदाजांनी अचूक वेध घेत सुवर्ण पदक जिंकत नवा इतिहास घडवलाय. भारताच्या पुरुष कंपाऊंड संघाने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ही कामगिरी केलीय. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात, फ्रेंच धनुर्धारींनी केवळ त्यांचे नेमबाजी कौशल्य दाखवले नाही तर कंपाउंड सांघिक स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून इतिहासही रचला.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिरंदाजांनी कंपाउंड सांघिक स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकलंय.
पुरुषांच्या कंपाउंड सांघिक स्पर्धेत प्रथमेश अमन आणि ऋषभ या त्रिकुटाने फ्रेंच संघाचा २३५-२३३ अशा फरकाने पराभव केला. यावरून असे दिसून येते की दोन्ही संघांमधील सामना खूपच रोमांचक आणि चुरशीचा झाला. दोन्ही संघांमधील सामना ४ सेटनंतर निकाली काढण्यात आला.
पहिल्या सेटनंतर भारत ५७-५९ ने पिछाडीवर होता. दुसरा सेट ११७-११७ ने बरोबरीत सोडवला. तिसऱ्या सेटमध्येही दोन्ही संघांनी १७६-१७६ असे गुण मिळवले. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या सेटची लढाई भारतासाठी महत्त्वाची ठरली. चौथ्या सेटमध्ये भारताने ५९ गुण मिळवले तर फ्रान्सने ५७ गुण मिळवले. परिणामी भारताने फ्रान्सला २३५-२३३ असा पराभव पत्करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.