Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Asia Cup 2025 News : आशिया कपमध्ये भारत फायलनमध्ये पोहोचला आहे. भारताने विरोधी संघ चीनला पाणी पाजलं आहे.
Asia Cup 2025
Asia Cup 2025Saam tv
Published On
Summary

भारताकडून ७-० च्या फरकाने चीनला धूळ चारली

हॉकीचा हा सामना बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडला

भारताच्या विजयात दिलप्रीत, अभिषेक आणि हरमनप्रीत यांनी महत्त्वाचं योगदान दिलं

अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार

Asia Cup 2025 : हॉकी आशिया कपमध्ये सुपर स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि चीनमध्ये रोमांचक सामना झाला. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्पलेक्स खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने ७-० या फरकाने चीनवर विजय मिळवला. भारताच्या या विजयाने फायनलमधील तिकीट निश्चित झालं आहे. आता टीम इंडियाचा सामना ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या दक्षिण कोरियाशी भिडणार आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची टीम आक्रमकरित्या खेळताना दिसली. भारताने चौथ्या मिनिटाला चीनविरोधात पहिला गोल केला. त्यानंतर सातव्या मिनिटाला संघाला पॅनल्टी कॉर्नर मिळला. पुढे दिलप्रीत सिंहने रिबाऊंड गोल केला. २-० ने स्कोर असताना पहिला क्वार्टर संपला. चीनचा संघ पहिल्या क्वार्टरमध्ये नरमला.

Asia Cup 2025
Vastu Tips: देवाला वाहिलेली फुलं विसर्जित करण्याची योग्य वेळ कोणती? शास्त्रात सांगितलाय महत्त्वाचा नियम

पुढील काही वेळेत भारत तिसरा गोल करण्यास यशस्वी ठरला. तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपत असताना भारताने ५-० ने आघाडी घेतली होती. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतासाठी अभिषेकने ४ मिनिटाला २ गोल केले. तर भारताने पुढे ७-० ने विजय निश्चित केला.

Asia Cup 2025
Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आतापर्यंत एकही सामन्यात पराभव झाला नाही. टीमने पहिल्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकले. तेव्हा चीनला ४-३ ने पराभूत केले. तर जपानला ३-२ ने पराभूत केले. भारताने कजाकिस्तानला १५-० ने धूळ चारली. भारतीय संघ टीम पूल-ए मध्ये पहिल्या क्रमाकांवर कायम राहिला.

Asia Cup 2025
Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

भारतीय संघाने ६ पैकी एक सामना गमावला. तो सामना २-२ ने अनिर्णित ठरला. त्याच संघाशी भारताचा फायनलमध्ये सामना होणार आहे. सुपर-४ मध्ये भारताचा पहिला सामना हा कोरियाशी झाला. त्यावेळी भारताचा कोरियाशी २-२ ने सामना अनिर्णित ठरला. कोरियाच्या संघालाही या स्पर्धेत फार चांगला खेळ दाखवला आला नाही. सुपर-४ मध्ये शेवटच्या सामन्यात मलेशियाला ४-३ ने पराभूत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com