Shaheen Afridi, Haris Rauf disrespect India's National Anthem x
Sports

IND Vs Pak : भारतीय राष्ट्रगीताचा पाकिस्तानी खेळाडूंकडून अपमान, राष्ट्रगीत सुरु असताना रौफ-आफ्रिदीनं नको ते केलं, पाहा Video

Asia Cup 2025 Final IND Vs Pak सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

  • हारिस रौफ आणि शाहीन आफ्रिदीवर भारतीय राष्ट्रगीताचा केला अपमान

  • भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान पाक खेळाडूंनी गप्पा मारल्याचा व्हिडीओ व्हायरल.

  • सोशल मीडियावर वाद पेटला; दोघांना नेटिझन्सनी ट्रोल केले.

Shaheen Afridi, Haris Rauf disrespect India's National Anthem : आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळला गेला. भारताने ५ विकेट्सने पाकिस्तानवर मात करत पुन्हा एकदा आशिया कप जिंकला. या सामन्यापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नव्या वादाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

प्रत्येक सामना सुरु होण्यापूर्वी जे दोन संघ सामना खेळत आहेत, त्या संघांचे, देशांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान पाकिस्तानचे दोन खेळाडू एकमेकांशी गप्पा मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचे राष्ट्रगीत सुरु असताना हारिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी दोघे गप्पा मारत होते. स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये ही गोष्ट कैद झाली. या कृतीने त्यांना ट्रोल केले जात आहे. रौफ आणि आफ्रिदी या दोघांवर भारतीय राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना भारतीयांना धारेवर धरले आहे.

आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अशा प्रत्येक सामन्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हँडशेक करण्यास नकार दिला. ही भूमिका भारतीय संघाने संपूर्ण प्रत्येक कायम ठेवली. हारिस रौफ-अभिषेक शर्माचा वाद, सूर्यकुमार यादवने पाकिस्तानने काढलेली लाज, हारिस रौफच्या सेलिब्रेशनला जसप्रीत बुमराहने दिलेले उत्तर अशा अनेक घटनांची चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

SCROLL FOR NEXT