महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघाने सर्वात आधी आशिया कपच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. श्रीलंकेत होत असलेले आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाने नेपाळच्या संघाचा ८२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय.
दांबुला येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेपाळला ८२ धावांनी पराभूत केला. नेपाळचा पराभव करताच टीम इंडियाचा टॉप ४ मध्ये प्रवेश पक्का झाला. आशिया कपच्या उपांत्य फेरीतही पाकिस्तानच्या संघानेही प्रवेश केलाय.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळविरुद्ध भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ३ गडी गमावून १७८ धावा केल्या. यात शेफाली वर्माची धमाकेदारी खेळी आठवणीत राहली. शेफालीने ८१ धावांची शानदार खेळी केली. वर्माला प्लेअर ऑफ मॅच घोषित करण्यात आले.
दरम्यान भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ २० षटकात ९ गडी गमावून केवळ ९६ धावा करू शकला. या पराभवासह नेपाळ आणि यूएई संघाचा या स्पर्धेतील प्रवास संपलाय. भारत आणि पाकिस्तान संघांनी अ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. ब गटातील एकही संघ अद्याप उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकलेत. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला, दुसऱ्या सामन्यात UAE आणि तिसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव केला. तर पाकिस्तान संघाने नेपाळ आणि यूएईचा पराभव करत टॉप ४ मध्ये स्थान मिळवले आहे. त्याचवेळी नेपाळने UAE विरुद्धचा एकमेव सामना जिंकला, तर UAE संघाला महिला आशिया कप T20 2024 मध्ये आपले खाते सुद्धा उघडता आले नाहीये. ग्रुप-ब मधून श्रीलंका आणि बांगलादेश देखील टॉप ४ मध्ये पोहोचेल अशी शक्यता आहे. तर मलेशिया आणि थायलँडच्या संघाचं आव्हान कायम आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.