IND W vs THAI W: भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक 2022 मध्ये आपली शानदार खेळी सुरु ठेवत थायलंडचा 84 चेंडू आणि 9 गडी राखून पराभव केला. बांगलादेशच्या सिलहटन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने थायलंडला 15.1 षटकांत केवळ 37 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 6 षटकांत एक गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.
भारताकडून एस मेघनाने 18 चेंडूत तीन चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या आणि पूजा वस्त्राकरने 12 चेंडूत 2 चौकार ठोकत 12 धावा केल्या. शेफाली वर्मानेही 8 धावांचे योगदान दिले.
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत थायलंडच्या फलंदाजांना एक एक करत माघारी धाडलं. थायलंडकडून फक्त एका खेळाडून दुहेरी आकडा गाठता आला. नान्नापत काँचारोएन्काईने 19 चेंडूत 12 धावा केल्या.
भारताकडून स्नेह राणाने चार षटकांत 9 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मेघना सिंग हिने एक विकेट घेतली. उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल राणाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
टीम इंडिया उपांत्य फेरीत
आशिया चषक 2022 मधील सहा सामन्यांमधला भारतीय संघाचा हा पाचवा विजय असून संघाचे आता 10 गुण झाले असून त्यांनी आता उपांत्य फेरी गाठली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.