IND VS SA : भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय, टीम इंडियाची शान ईशान, श्रेयस अय्यरचं दमदार शतक

ईशान किशन आणि श्रेयस अय्यरने आक्रमक खेळी करत भारताची विजयाच्या दिशेनं वाटचाल केली.
Shreyas iyer and ishan kishan
Shreyas iyer and ishan kishansaam tv
Published On

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात भारताचा नऊ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आजचा रांचीत झालेला दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी निर्णायक होता. आफ्रिकेचे आक्रमक फलंदाज रिझा हेंड्रीक्सने आणि एडन मार्करमच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेनं भारताला 279 आव्हान दिलं होतं. परंतु, भारताचे स्टार फलंदाज ईशान किशन आणि श्रेयस अय्यरने आक्रमक खेळी करत भारताची विजयाच्या दिशेनं वाटचाल केली.

श्रेयसने दमदार शतक ठोकलं. त्यामुळे भारताने आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. श्रेयसने 111 चेंडूत 113 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर ईशानने 84 चेंडूत 93 धावा कुटल्या. भारताने या सामन्यात 45.5 षटकांत 3 विकेट्स गमावून 282 धावा करून एकतर्फी विजय मिळवला. (India won second one day match against south africa)

ईशानने मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने 84 चेंडूत 93 धावा कुटल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज 48 धावा करून तंबूत परतले. कर्णधार शिखर धवनने 13 तर शुभमन गिल 26 चेंडूत 28 धावा केल्या. श्रेयसने 111 चेंडूत 113 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर ईशानने 84 चेंडूत 93 धावा कुटल्या. तसेच संजू सॅमसनने 36 चेंडूत 30 धावांची सावध खेळी केली.

Shreyas iyer and ishan kishan
Viral video : गोलंदाजाने लावल्या चक्क 9 स्लिप, तरीही चेंडूने चकवा दिला, मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल

आफ्रिकेचे सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि जानेमन मलानने निराशाजनक खेळी केल्यामुळं पॉवर प्लेमध्ये आफ्रिकेला धावांचा सूर गवसला नाही. परंतु, त्यानंतर मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचे आक्रमक फलंदाज रिझा हेंड्रीक्सने आणि एडन मार्करमने जबरदस्त अर्धशतकी खेळी साकारली. दरम्यान, आफ्रिकेनं भारताला 279 धावांचा लक्ष्य दिलं होतं. मात्र, भारताचे स्टार फलंदाज ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी भागिदारीमुळं भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या.

आफ्रिकेनं दिलं होतं भारताला 279 धावांचं आव्हान

दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फंलंदाज क्विंटन डीकॉक आणि जानेमन मलानने निराशाजनक कामगिरी केली. आफ्रिकेसाठी पॉवर प्लेमध्ये त्यांना धावांचा पाऊस पाडता आला नाही. कारण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) अवघ्या 5 धावांवर असताना डीकॉकचा त्रिफळा उडवला. त्यानंतर दबावात खेळत असलेल्या मलानलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. शाहबाज अहमदने मलानला 25 धावांवर असताना पायचित केले.

Shreyas iyer and ishan kishan
T20 World Cup : वर्ल्डकपसाठी खेळाडू सज्ज, टीम इंडियाचा नवा प्लान माहितेय का? पूर्ण शेड्युल वाचा सविस्तर

परंतु, आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज रिझा हेंड्रीक्सने (Reeza Hendricks) धावसंख्येचा वेग वाढवला. अतिशय सावधपणे फलंदाजी करत रिझाने 76 चेंडूत 74 धावा केल्या. या इनिंगमध्ये रिझाने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रिझा झेलबाद झाल्याने आफ्रिकेला पुन्हा एकदा धक्का बसला.

त्यानंतर हेनरिक क्लासेनने आफ्रिकेची कमान सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही 30 धावाच करता आल्याने आफ्रिकेच्या धावफलकाला पुन्हा ब्रेक लागला. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर क्लासेन झेलबाद झाला. पण एडन मार्क्ररमने (Aiden Markram) अप्रतिम फलंदाजी करत 89 चेंडूत 79 धावा केल्या. या पारीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. तसेच डेव्हिड मिलरने 34 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी साकारत आफ्रिकेच्या धावांचा आलेख चढता ठेवला. भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने 10 षटकात 38 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com