VIDEO: संभ्रम नाहीच, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, पण.. ; जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका
काय करायचं आणि काय नाही याबद्दल संभ्रम निर्माण केले जात आहे. मात्र आता कोणताही संभ्रम नको आहे. ज्याला पडायच त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. फक्त ज्यांनी अरक्षणामुळे मराठ्यांना त्रासस दिला त्यांना सोडू नका, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. आज आंतरवली सराटीत पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला त्रासस देणाऱ्यांना आपली ताकद आणि एकजूट मतदानातून दाखवून द्या असंही यावेळी त्यांनी म्हंटलं.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या. संभ्रम नकोय. तुम्हाला वाटत असेल त्याला पाडा. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराकडून काही लिहून घेण्यापेक्षा त्यांचे मराठ्यांनी व्हिडिओ मराठ्यांनी घ्यावे. आपल्या मताला जो सहमत असेल त्याला तुम्ही मत द्या. मराठ्यांना सगळं माहीत आहे. आपला समाज सुज्ञ आहे. मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. कोणाला मत द्यायचं हे मराठा समाजाला सांगायची गरज नाही, असंही मनोज जरांगे यांनी म्हंटलं आहे.
आपल्या लेकराबाळांचा घास ज्यांनी हिसकावून घेतला त्यांना सोडायचं नाही. मराठ्यांनी एकजूट होऊन मतदान करायचं. मराठा समाज मला संकटात सापडू देणार नाही. सर्वांनी एकजुटीने मतदान करा, यापुढे मला समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णवेळ काम करायचं आहे, अशी माहिती देखील जरांगे पाटील यांनी यावेळी दिली.
Edited By Rakhi Rajput
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.