ind vs pak match, asia cup points table twitter
Sports

IND VS PAK, Asia CUP Points Table: पावसानं 'खेळ' केला; पाकिस्तानचा मोठा फायदा, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, काय आहे समीकरण?

Asia Cup 2023 Points Table After IND VS PAK Match: पाहा काय आहे समीकरण.

Ankush Dhavre

India vs Pakistan,Asia Cup 2023 Points Table:

आशिया चषक २०२३ स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. यावेळी देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. हा रोमांचक सामना पावसामुळे रद्द झाला मात्र याचा फायदा पाकिस्तान संघाला झाला आहे.

हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानचा मोठा फायदा झाला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला आहे. यासह एकही चेंडू न खेळता पाकिस्तानचा संघ सुपर -४ फेरीसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी विजय मिळवला होता. तर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता.

भारतीय संघाचा पुढील सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. जर भारतीय संघाला सुपर ४ मध्ये प्रवेश करायचा असेल. तर येणारा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. जर भारताने हा सामना गमावला तर २ गुणांसह नेपाळचा संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल.

सामना पावसामुळे रद्द..

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सुरुवातीला पूर्णपणे चुकीचा ठरत असल्याचे चित्र दिसून आले.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताचा सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारताचा टॉप ऑर्डर फोडून काढला. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. (Latest sports updates)

केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या ईशान किशनने संधीचं सोनं केलं आणि हार्दिक पंड्यासोबत मिळून विक्रमी भागीदारी केली. दोघांनी मिळून १३८ धावांची भागीदारी केली. ही पाचव्या विकेटसाठी आशिया चषकात केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे.

यापूर्वी हा रेकॉर्ड माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि राहुल द्रविडच्या नावे होता. या डावात ईशान किशनने ८१ चेंडूंचा सामना करत ८२ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने ९० चेंडूंचा सामना करत ८७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर २६६ धावा केल्या होत्या.

यासह पाकिस्तान संघाला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पावसाची तुफान फटकेबाजी काही थांबलीच नाही. अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT