asia cup 2023 live streaming  saam tv
क्रीडा

Asia Cup 2023, Live Streaming: केव्हा आणि कुठे रंगणार आशिया चषकातील सामने? फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग अन् सामन्याची वेळ;जाणून घ्या

When And Where To Watch Asia Cup 2023: जाणून घ्या केव्हा आणि कुठे रंगणार आशिया चषकातील सामने.

Ankush Dhavre

Asia Cup 2023 News:

आशिया चषक २०२३ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे.

स्पर्धेतील केवळ ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहे. तर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

ज्यात अंतिम सामन्याचा देखील समावेश असणार आहे. पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. हा सामना ३० ऑगस्ट रोजी रंगणार आहे.

कुठे रंगणार आशिया चषक स्पर्धेतील सामने?

आशिया चषक स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणार आहे.पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांचे आयोजन मुल्तान आणि लाहोरमध्ये केले जाणार आहे. तर श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांचे आयोजन कँडीतील पलेकल्ले क्रिकेट स्टेडीअम आणि कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडिअमवर रंगणार आहे.

भारतात किती वाजता सुरू होणार सामना?

आशिया चषक स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन २ वेगवेगळ्या देशात करण्यात येत असले तरीदेखील हे सामने दुपारी ३ वाजता सुरू होणार आहेत. (Latest sports updates)

भारतात कुठे पाहता येणार सामने?

भारतात आशिया चषक स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर केले जाणार आहे. ज्यात स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि इंग्रजीसह एचडी चॅनेलवर देखील लाईव्ह प्रक्षेपित केले जाणार आहे. तर तुम्हाला हा सामना डिज्नी प्लस हॉटस्टारवर फ्रिमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच हॉटस्टार ब्राउसरवर देखील हा सामना लाईव्ह पाहायला मिळणार आहे.

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT