Asia Cup 2022 suryakumar yadav on Virat Kohli / BCCI Twitter SAAM TV
क्रीडा

आदरानं झुकलेल्या 'विराट' कोहलीच्या 'त्या' एका कृतीनं तळपलेला सूर्यही भारावला; म्हणाला...

सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद खेळीमुळं विराट कोहली देखील प्रभावित झाला होता.

Nandkumar Joshi

मुंबई: टीम इंडियाचा (Team India) स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याचीच सध्या जोरदार चर्चा आहे. यापेक्षा चर्चा आहे ती यशाच्या 'विराट' शिखरावर पोहोचलेल्या कोहलीच्या एका व्हिडिओची. आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादव अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. पण त्याची कसर त्याने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भरून काढली.

सूर्यकुमार यादव यानं या सामन्यात तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. त्याची ही विस्फोटक इनिंग बघून विराट कोहलीही त्याच्या प्रेमात पडला आणि सूर्यकुमार पव्हेलियनमध्ये परतत असताना त्याच्यासमोर आदरानं झुकला.

भारतीय (Team India) फलंदाजी सुरुवातीला चांगली झाली नाही. खेळी संथगतीने सुरू होती. अखेरच्या षटकांत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी तुफानी खेळी केली. या दोघांनी नाबाद ९८ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार अधिक आक्रमक अंदाजात खेळला. त्याने अवघ्या २६ चेंडूंमध्ये ६८ धावा कुटल्या. यात सहा चौकार आणि सहा षटकार होते.

अखेरच्या षटकात सूर्यकुमारने चार षटकार तडकावले. कोहली सूर्यकुमारची फलंदाजी बघून हैराण झाला. डाव संपल्यानंतर सूर्यकुमार पव्हेलियनमध्ये परतत असताना कोहली त्याच्यासमोर आदरानं झुकला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कधीकाळी आक्रमक असलेला विराट कोहली आणि सूर्यकुमारचा जुना व्हिडिओही व्हायरल झाला. यानंतर प्रत्येकाची वेळ येत असते, अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर आल्या होत्या. पण विराटच्या या कृतीनं सूर्यकुमारही भारावून गेला.

माझ्यासाठी हा हृदय जिंकणारा क्षण होता. कारण मी असं कधी बघितलं नाही. ते पुढे का जात नाहीत, याचा विचार मी करत होतो. कारण ते माझ्या मागे होते. त्याचवेळी आपण दोघेही सोबत जाऊ, असं सांगितलं. ते इतके अनुभवी फलंदाज आहेत की त्यांच्यासोबत फलंदाजी करण्याचा मी आनंद लुटला, असं सूर्यकुमार म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT