Asia Cup 2022 : चुकीला माफी नाहीच!; 'अर्धशतका'मुळे शिक्षा तर मिळणारच, टीम इंडियातून 'आऊट'?

आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं दमदार विजय मिळवला. पण या खेळाडूला टीम इंडियाबाहेर राहावं लागण्याची शक्यता आहे.
Asia Cup 2022 Latest News In Marathi
Asia Cup 2022 Latest News In Marathi SAAM TV
Published On

Asia Cup 2022, India vs Hong kong | मुंबई: आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं दमदार विजय मिळवला. भारतीय संघानं बुधवारी हॉंगकॉंगला ४० धावांनी पराभूत केलं. या विजयासह टीम इंडिया सुपर ४ मध्ये पोहोचली.

भारतीय संघानं (Team India) हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला खरा पण संघातील वेगवान गोलंदाजांनी तुलनेने निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. अर्शदीप सिंग आणि आवेश खान (Avesh Khan) हे दोघेही वेगवान गोलंदाज हाँगकाँगसारख्या नवख्या संघासमोर निष्प्रभ ठरले. त्यांनी अपेक्षेपेक्षा खूपच अधिक धावा दिल्या. आवेश खान याने तर धावांचे 'अर्धशतक'च केले.

Asia Cup 2022 Latest News In Marathi
तब्बल १८ वेळा हार्दिकनं भारताचा झेंडा फडकविला साता समुद्रापार; वाचा पाटलांची कामगिरी

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी तिघांनी मिळून ११ षटकांत ४८ धावा दिल्या. तर दुसरीकडे एकट्या आवेश खानने आपल्या ४ षटकांत ५३ धावा दिल्या. आवेश खानचा इकॉनॉमी रेट १३.२० प्रति ओव्हर होता. आवेश खानला चार षटकार आणि ५ षटकार लगावले. याचाच अर्थ केवळ षटकार आणि चौकारांवरच त्याने ४६ धावा दिल्या.

आवेश केवळ याच सामन्यात नाही तर, आतापर्यंतच्या टी २० सामन्यांत त्यांना खूपच धावा दिल्या. आवेशने आतापर्यंतच्या १४ टी २० इनिंगमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत. पण इकॉनॉमी रेट ९ पेक्षा अधिक आहे. त्याची कामगिरी अत्यंत खराब आहे. त्यामुळे टीम इंडियात स्थान पक्कं करणं त्याच्यासाठी खूपच कठीण आहे.

Asia Cup 2022 Latest News In Marathi
Video: कधी डोळे दाखवून घाबरवायचा, आता त्याच्यासमोर डोकं टेकवले; कोहलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

अर्शदीप सिंगनेही गोलंदाजीत फारशी कमाल दाखवली नाही. हाँगकॉंगविरुद्ध तोही प्रभाव पाडू शकला नाही. अर्शदीपला चार षटकांत ८ चौकार ठोकले. त्याने दोन नो बॉलही फेकले. ही कामगिरी टीम इंडियासाठी चिंताजनक आहे.

हाँगकाँगविरुद्ध टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या. विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार फलंदाजी केली. दोघांनीही अर्धशतक केले. सूर्यकुमारने २६ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या. तर हाँगकाँगच्या संघाने १५२ धावा केल्या. गोलंदाजीत युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी चांगली कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com