तब्बल १८ वेळा हार्दिकनं भारताचा झेंडा फडकविला साता समुद्रापार; वाचा पाटलांची कामगिरी

हार्दिकचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
hardik patil , ironman , virar
hardik patil , ironman , virarsaam tv
Published On

Hardik Patil Ironman : एक दाेन वेळा नव्हे तर तब्बल १८ वेळा ट्रायथलाॅन स्पर्धा पुर्ण करुन आर्यनमॅनचा किताब पटकाविणारे विरारचे (virar) हार्दिक पाटील ठरले आहेत. पाटील यांनी १५ वी कलमार-स्वीडन २०२२ स्पर्धेत नुकतेच यश मिळविलं आहे. पाटील हे १८ वेळा आयर्नमॅनचा (ironman) किताब पूर्ण करणारे पहिले व एकमेव भारतीय ठरले आहेत. पाटील यांच्या यशानं वसई विरारकरांसह प्रत्येक भारतीय नागरिकाचा ऊर भरुन आला आहे.

विरारमध्ये राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील याने १५ वी 'कलमार-स्वीडन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा २०२२ यशस्वीरित्या नुकतीच पार केली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मागील १० आठवड्यामध्ये हार्दिक याने २ आयर्नमॅन स्पर्धा तालीन, एस्टोनिया व तर १ स्पर्धा कलमार- स्वीडन येथे अशा तीन आयर्नमॅन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

hardik patil , ironman , virar
Ganeshotsav : आवाज वाढव डीजे तुला..., पाेलिसांचं हाेतं लक्ष, चार गणेशाेत्सव मंडळं अडचणीत

आयर्नमॅन स्पर्धा १५ वेळा पूर्ण करणारा हार्दिक पाटील हा दुसरा भारतीय ठरला आहे. हाफ आयर्नमॅन स्पर्धा हार्दिकनं १८ वेळा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे तो पहिला व एकमेव भारतीय ठरला आहे. हार्दिकच्या या कामगिरीबद्दल विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.

हार्दिकचे सर्व स्तरावरून (sports) कौतुक केले जात आहे. दरम्यान सातत्याने सराव केल्याने हे यश मिळाले आहे. 3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणे अशी आव्हाने १७ तासांत पूर्ण करण्याचे लक्ष आयर्नमॅन स्पर्धेत स्पर्धेकांसमोर असते असे हार्दिक पाटीलनं नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

hardik patil , ironman , virar
Forest Department : लाचलुचपतच्या धसक्यानं वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या; कुटुंबाची पाेलीसांत धाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com