Asia Cup 2022 India vs Pakistan Latest Update / Social Media SAAM TV
Sports

India vs Pakistan, Asia Cup 2022 : पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात टीम इंडियासमोर 'ही' ५ मोठी आव्हानं

पाकिस्तानच्या पाच खेळाडूंविरोधात विशिष्ट रणनीती आखावी लागेल. तरच हा सामना भारताला जिंकता येईल.

Nandkumar Joshi

Asia Cup 2022, India vs Pakistan T 20 Match | मुंबई: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आशिया कप २०२२ स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांविरुद्ध भारतानं विजय मिळवला आहे. सुपर ४ फेरीत जागा निश्चित केली आहे. भारताचा संघ आता सुपर ४ मध्ये पाकिस्तानशी पुन्हा भिडणार आहे. पण भारताला पाकिस्तानच्या पाच खेळाडूंना रोखणे कठीण जाणार आहे. त्यांना रोखण्यासाठी खास रणनीती आखून पाकिस्तानविरुद्धचा हा महामुकाबला जिंकावाच लागेल.

टीम इंडियाचा (Team India) सुपर ४ मधील पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होत आहे. पहिल्या फेरीतील दोन्ही सामने जिंकून भारताचा संघ ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी राहिला आहे. ज्या पाकिस्तानला पहिल्या सामन्यात मात दिली, त्याच पाकिस्तानसोबत आता सुपर ४ मधील सामना भारताला खेळावा लागतोय. या सामन्यात पाकिस्तानच्या पाच खेळाडूंविरोधात विशिष्ट रणनीती आखावी लागेल. तरच हा सामना भारताला जिंकता येईल.

पहिल्या फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे. (India vs Pakistan) पाकिस्तानने त्यावेळी १४७ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने अखेरच्या षटकात हे लक्ष्य गाठून विजय मिळवला. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने अष्टपैलू कामगिरी केली. तर रवींद्र जडेजाने देखील महत्वाची खेळी केली. मात्र, जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

पाकिस्तान (Pakistan) संघाला भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं असलं तरी, त्यांनी हाँगकाँगला पराभूत करून सुपर ४ मध्ये जागा निश्चित केली. त्यांनी १५५ धावांनी मोठा विजय मिळवला. हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. याचाच अर्थ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं या स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं आहे.

पाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरणार डोकेदुखी

पाकिस्तानचे पाच खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यात विकेटकीपर मोहम्मद रिझवान टॉपवर आहे. त्याने आतापर्यंतच्या दोन सामन्यांत सर्वाधिक १२१ धावा केल्या आहेत. त्यात एक नाबाद ७८ धावांचीही खेळी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १२२ चा आहे.

पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमान यानेही जबरदस्त पुनरागमन केलं आहे. त्याने हाँगकाँगविरुद्ध ५३ धावांची सुरेख खेळी केली. बाबर आझम भलेही पहिल्या दोन सामन्यांत मोठी धावसंख्या करू शकला नाही, पण त्याचा टी-२० रेकॉर्ड खूपच जबरदस्त आहे.

पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाह याने आशिया कप २०२२ मध्ये पदार्पण केलं. पहिल्या दोन सामन्यांत त्याने उत्तम कामगिरी केली आहे. भारत आणि हाँगकाँग या दोन्ही संघांविरुद्ध त्याने चुणूक दाखवून प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे त्याने ५.६६ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

मोहम्मद नवाझ यानेही आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली आहे. त्याने भारताविरुद्ध तीन विकेट घेतल्या होत्या. त्याने हाँगकाँगविरुद्ध तर केवळ ५ धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंत त्याने दोन्ही सामन्यांत सहा विकेट घेतल्या असून, ६.७० च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

लेग स्पिनर शादाब खान याने हाँगकाँगविरुद्ध केवळ ८ धावा देत चार विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्ध त्याला विकेट मिळाली नव्हती. त्याने आतापर्यंत ४ विकेट घेतल्या असून, ४.०५ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT