IND VS HKG Match Saam TV
Sports

IND VS HKG: टीम इंडियाला करावी लागतील 'ही' ४ कामे, पाकिस्तानचा पुन्हा करणार काम तमाम

टीम इंडिया हाँगकॉंगविरुद्ध विजयी होईल, अशी सर्वांनाच खात्री आहे. पण या सामन्यामध्ये टीम इंडियाला सतावणाऱ्या चार गोष्टींवर मात करता येऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Asia Cup 2022: आशिया चषक २०२२ मध्ये पहिल्याच सामन्यात टीम इंडियानं (Team India) पाकिस्तानला पराभूत केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ५ विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला. आता टीम इंडिया हॉंगकॉंगशी भिडणार आहे.

हा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. हा सामना जिंकल्यानंतर सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. तसेच पुन्हा रविवारी भारताला सामना पाकिस्तानसोबतही (India vs Pakistan) होऊ शकतो. अशा वेळी हाँगकॉंगविरुद्धचा (Hong Kong) सामना भारतीय संघाला जिंकावा लागेल. टीम इंडिया हाँगकॉंगविरुद्ध विजयी होईल, अशी सर्वांनाच खात्री आहे. पण या सामन्यामध्ये टीम इंडियाला सतावणाऱ्या चार गोष्टींवर मात करता येऊ शकते.

१. के. एल. राहुल (KL Rahul) फॉर्मात नाही ही टीम इंडियाची मोठी समस्या आहे. राहुलने टीम इंडियात वापसी केल्यापासून खेळलेल्या तिन्ही डावांत खराब कामगिरी केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध दोन वनडे सामन्यांत तो अयशस्वी ठरला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. अशावेळी हॉंगकॉंगविरुद्ध त्याने चांगली खेळी करावी, ती फॉर्मात येण्यास मदतगार ठरेल, असे टीम इंडियाला वाटते. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या संभाव्य सामन्याआधीच के. एल. राहुल फॉर्मात आला तर, टीम इंडियासाठी ही गोष्ट फायदेशीर ठरेल.

पाहा व्हिडीओ -

२. विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म ही दुसरी सर्वात मोठी चिंता. पाकिस्तानविरुद्ध त्याने ३५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण त्यातही विराट पूर्णपणे फॉर्मात दिसला नाही. हाँगकाँगविरुद्ध विराट कोहलीनं अर्धशतक ठोकलं तर, त्याचा आत्मविश्वास आणखी वाढेल.

३. सूर्यकुमार यादव अद्यापही खुलून खेळत नाही. अर्थात त्याचा नैसर्गिक खेळ करत नाही. पाकिस्तानविरुद्ध तो दबावात खेळत असल्याचे स्पष्ट झालं होतं. ३६० डीग्रीत खेळणारा हा खेळाडू एकही असा फटका मारू शकला नाही, ज्याने पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडेल. त्यामुळे आता सूर्यकुमारला हॉंगकॉंगविरुद्ध आपला नैसर्गिक खेळ दाखवावा लागेल.

४. हाँगकाँगविरुद्ध टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना संघातील फलंदाजांना दुबईच्या पिचचा अंदाज लावता येईल. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या संभाव्य सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीची संधी मिळू शकते. अशा वेळी हाँगकॉंगविरुद्ध भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मिळाल्यास परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो आणि त्याचा फायदा पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

SCROLL FOR NEXT