जिंकलंस भावा! विराट कोहलीनं पूर्ण केली पाकिस्तानी खेळाडूची इच्छा, Video व्हायरल

दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांचे स्वागत केले. पण विराट कोहली यात चर्चेत राहिला. विराट कोहलीनं (Virat Kohli) पाकिस्तानच्या खेळाडूची एक इच्छा पूर्ण केली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Virat kohli
Virat kohli saam tv
Published On

मुंबई: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने-सामने येतात, तेव्हा ही लढत चुरशीची होणारच. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडू स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. वाट्टेल ते झाले तरी जिंकायचंच, या इराद्याने ते मैदानात उतरतात. मैदानावर ते परस्परांशी भिडणार असले तरी, मैदानाबाहेर त्यांच्यातील मैत्रीचे किस्सेही ऐकायला मिळतात. आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंच्या भेटीगाठींचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांचे स्वागत केले. पण विराट कोहली यात चर्चेत राहिला. विराट कोहलीनं (Virat Kohli) पाकिस्तानच्या खेळाडूची एक इच्छा पूर्ण केली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ( Virat Kohli News)

आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात काट्याची टक्कर झाली. यात भारतानं अखेरच्या षटकांत विजय मिळवला. हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावला. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ हा विराट कोहलीला भेटण्यासाठी गेला. रऊफनं कोहलीसोबत बऱ्याच गप्पा मारल्या. त्याच्यासोबत चर्चा केली. याचा व्हिडिओ बीसीसीआयनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

सामना भलेही संपला असेल, मात्र अशा प्रकारचे क्षण नेहमीच लक्षात राहतील. विराट कोहलीनं यावेळी सगळ्यांचीच मने जिंकली. त्याने स्वतःची स्वाक्षरी केलेली जर्सी रऊफला भेट दिली. विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या पाकिस्तानातही मोठी आहे. विशेषतः पाकिस्तानी खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य हे विराट कोहलीचे फॅन आहेत. अशा वेळी पाकिस्तानी खेळाडूंना जेव्हा जेव्हा संधी मिळते, त्यावेळी ते कोहलीचं ऑटोग्राफ घेण्याची संधी सोडत नाहीत.

शाहीन आफ्रिदी हा जायबंदी असल्यानं तो आशिया चषक स्पर्धेत खेळू शकत नाही. मात्र, तो संघासोबत आला होता. सामन्यापूर्वी सराव करताना भारतीय संघातील खेळाडू मैदानावर जात होते, त्यावेळी त्यांनी शाहीन आफ्रिदीशी चर्चा केली. त्याच्या प्रकृतीची विचारणा केली. युजवेंद्र चहल, विराट कोहली, रिषभ पंत हे देखील होते. कोहलीचा बाबर आझमसोबतचा चर्चा करतानाचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानेही बाबर आझमशी चर्चा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com