Rohit Sharma Reaction On Virat Kohli Dismissal saam tv
Sports

Virat Kohli Dismissal: शेवटच्या बॉलवर विराटची विकेट जाताच हळहळला रोहित शर्मा, हिटमॅनची रिएक्शन होतेय व्हायरल

Rohit Sharma Reaction On Virat Kohli Dismissal: तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर विराट कोहलीने विकेट गमावली आणि टीम इंडियाचे सर्व चाहते हळहळले. यावेळी ड्रेसिंग रूममधून रोहितची रिएक्शन देखील आता व्हायरल होतेय.

Surabhi Jayashree Jagdish

बंगळूरूमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना रंगला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगली कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली. मात्र तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर विराट कोहलीने विकेट गमावली आणि टीम इंडियाचे सर्व चाहते हळहळले. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेला रोहित शर्माही हताश झाल्याचं पहायला मिळालं.

बंगळुरू टेस्टमध्ये तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने दुसऱ्या डावात 70 रन्सची शानदार खेळी केली. कोहलीने सरफराज खानसोबत १३६ रन्सची पार्टनरशिप केली. मात्र तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट कोहली बाद होताच गोलंदाज ग्लेन फिलिप्स आणि किवी खेळाडूंनी एकच जल्लोष केला. ग्लेन फिलिप्सच्या बॉलवर विकेटकीपरने विराट कोहलीचा कॅच घेतला. मात्र विराटची विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा फार हताश झाला होता.

कोहलीला मैदानी अंपयारने आऊट करार दिल्यानंतर विराटने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये ग्लेन फिलिप्सचा बॉल विराट कोहलीच्या बॅटला लागला आणि विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये गेल्याचं स्पष्ट झाले. यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.

यावेळी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माही दुखावला होता. रोहित शर्माची रिएक्शन पाहण्यासारखी होती. विराट बाद झाल्याचं समजताच तो खूप निराश दिसत होता. आता रोहित शर्माची रिएक्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

रोहित शर्माची विकेटचा व्हिडीओ व्हायरल

या सामन्यातील दुसऱ्या डावामध्ये रोहित शर्मा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने बाद झाला. 22 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माची विकेट गेली. रोहितने एजाज पटेलचा बॉल खेळला आणि त्यानंतर बॉल मागे जाऊन विकेटला लागला. रोहित शर्माची अशी विकेट जाण्याचा कोणी विचारही केला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT