हारिस रौफने भारताला ६-० इशारा करत डिवचले.
अर्शदीप सिंहने हातवारे करत त्याला चोख उत्तर दिले.
दोन्हींचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
Asia Cup 2025 मधील सुपर फोर सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी (२१ सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला. रौफ यांच्या कृतीचा भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंहने चोख उत्तर दिले. अर्शदीप सिंहचा भारत-पाकिस्तान सामन्यातला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर फायरिंगचे सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनमुळे वातावरण तापले. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना रौफने भारतीय चाहत्यांकडे पाहत ६-० असा इशारा केला. असे करताना त्याने हाताने विमान खाली पडल्याचे दाखवले. ही कृती ऑपरेशन सिंदूरशी जोडली असल्याचे म्हटले जात आहे.
'आम्ही सहा विमाने पाडली' असे हारिस रौफने इशाऱ्यात म्हटले. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रौफच्या ६-० या इशाराला अर्शदीप सिंहने चोख उत्तर दिले आहे. अर्शदीपच्या व्हिडीओमध्ये तो गर्दीकडे बोट दाखवत, हातांनी विमान बनवताना दिसतो. हाताने हातवारे करत अर्शदीपने पाकिस्तानला त्यातही हारिफ रौफला त्याची जागा दाखवली आहे.
फक्त क्षेत्ररक्षणादरम्यानच नाही तर, गोलंदाजी सुरु असतानाही हारिफ रौफने वाद घातल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मासोबत तो विनाकारण भांडायला गेला. दुसऱ्या डावाच्या पाचव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. शुबमन गिलने चौकार मारल्यानंतर ओव्हरच्या शेवटी अभिषेक आणि रौफ यांच्या वाद झाला. पंचांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.