Arshdeep Singh  saam tv
क्रीडा

रोज ५० किमी प्रवास, व्हिडिओ बघून गोलंदाजी शिकला; आता सोन्याचे दिवस, चक्रावून टाकणारा प्रवास

क्रिकेट अकॅडमीत जाण्यासाठी अर्शदीप सिंग दररोज सायकलने ५० किमीचा प्रवास करायचा.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या (IPL 2022) हंगामात पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) चमकदार कामगिरी केलीय. त्याच्या भेदक गोलंदाजीनं अनेक खेळाडूंना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. अर्शदीपने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असून त्याने केलेल्या दमदार कामगिरीची पोचपावतीही त्याला मिळाली आहे. आगामी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी अर्शदीप सिंगची निवड करण्यात आलीय. भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) खेळण्याचं देशातील लाखो क्रिकेटर्स उराशी बाळगून असतात. अर्शदीपनंही सुरुवातीपासूनच भारतीय संघासाठी खेळण्याचा निर्धार केला होता. क्रिकेट करियरला सुरुवात केल्यापासून भारतीय संघात निवड होईपर्यंतचा अर्शदीपचा प्रवासही खडतर होता.

अर्शदीप क्रिकेट अकॅडमीत जाण्यासाठी त्याच्या घरुन दररोज सायकलने ५० किमीचा प्रवास करायचा. आयपीएलच्या गेल्या हंगामातच अर्शदीप सिंग चर्चेत आला होता. यावर्षी तर अर्शदीपने जबरदस्त गोलंदाजी करत सर्वांच्या भुवया उंचावल्या. अर्शदीप हा डावखूरा वेगवान गोलंदाज असून तो डेथ ओव्हर्समध्ये तो हुकमी गोलंदाज आहे. पंजाब किंग्जने यंदाच्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वीच अर्शदीपला रिटेन केलं होतं.

टीम इंडियात अर्शदीप सिंगची निवड आहे महत्वाची ?

अर्शदीप सिंगला आयपीएल २०२२ मध्ये जास्त विकेट्स मिळाल्या नाहीत. परंतु, डेथ ओव्हर्समध्ये त्याचा इकॉनमी रेट चांगला आहे. अर्शदीपने आतापर्यंत घेतलेल्या विकेट्समध्ये जास्त विकेट्स या डेथ ओव्हरमध्ये पटकावल्या आहेत. यंदाच्या हंगामात १४ सामन्यांमध्ये अर्शदीपने १० विकेट्स घेतल्या आहेत. तर ७.७० एवढी इकॉनमी ठेवण्याची उत्तम कामगिरीही त्याने केलीय. टी-२० सामन्यांमध्ये डेथ ओव्हर्सला अनन्य साधारण महत्व आहे आणि अर्शदीप डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. तसंच तो डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने टीम इंडियाला त्याची आवश्यकता आहे.

अर्शदीप सिंगचे कोच जसवंत राय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आयपीएल २०२२ मध्ये अर्शदीपने डेथ ओव्हर्समध्ये फंलंदाजांवर चांगलं नियंत्रण ठेवलं आहे. लीगमध्ये डेथ ओव्हर्समध्ये सर्वोत्कृष्ठ सरासरी राखण्याच्या गोलंदाजांमध्ये अर्शदीप एक आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याने धावा रोखण्यासह विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केलीय. याच कौशल्यांमुळं आगामी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० सीरिजसाठी अर्शदीपची भारतीय संघात निवड झाली.

वसीम अक्रमचे व्हिडिओ पाहून गोलंदाजीचे धडे गिरवले

" मी अर्शदीपला त्याची गोलंदाजी स्लो मोशनमध्ये बघायला सांगितलंच होतं, पण वसीम अक्रमच्या गोलंदाजीचे व्हिडिओ दाखवूनही प्रशिक्षण दिलं. मी अर्शदीपला वसीमचे उसळते चेंडू (बाउंसर ) दाखवले. अक्रम ज्या प्रमाणे क्रिजचा वापर करुन गोलंजदाजी करायचा, ते व्हिडिओ दाखवून त्याला गोलंदाजी करायला शिकवलं" असं अर्शदीपचे कोच जसवंत राय यांनी म्हटलं आहे.

इंडिया खेळण्याच्या उत्साहामुळे रोज ५० किमीचा प्रवास

अर्शदीप सिंगचा घर पंजाबच्या खरड मध्ये आहे. पण जेव्हा त्यानं क्रिकेटर व्हायचं ठरवलं, त्यावेळी त्याने जसवंत राय यांच्या अॅकेडमीत अॅडमिशन घेतलं. खरड ते चंडीगढमध्ये जवळपास २५ किमीचं अंतर आहे. अर्शदीप रोज दोनवेळा त्याच्या सायकलने खरड ते चंडीगढ असा प्रवास करायचा. त्याचवेळी मला त्याच्यावर विश्वास बसला की, एक दिवस अर्शदीप इंडिया खेळेल. असंही त्याचे कोच राय माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT