GT VS MI IPL 2023: मंगळवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा मुंबई इंडियन्स संघाचा या हंगामातील चौथा पराभव आहे.
या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीदेखील अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी गोलंदाजीत जास्त धावा दिल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
अर्जुनने या सामन्यात गोलंदाजी करताना २ षटकात केवळ ९ धावा खर्च केल्या आणि वृद्धिमान साहाची विकेट मिळवली. त्यानंतर तो फलंदाजी करताना देखील दिसून आला होता. ज्यावेळी तो क्रिझवर होता त्यावेळी नेहाल वाढेरा नॉन स्ट्राइकला होता.
नेहालने १८ व्या षटकात संघातील वरिष्ठ खेळाडू पियूष चावला सोबत चुकीचे कृत्य केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने पियूष चावला कॉल न देता धाव घेण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पियूषला धक्का देखील दिला.
ही धाव पूर्ण करताना पियूष चावला धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर क्रिझवर आला. अर्जुन सोबत देखील त्याने तेच केले जे पियूष चावला सोबत केले होते. वढेराने शॉट मारला, त्यावेळी अर्जुन धाव घेण्यासाठी धावला.
अर्जुन क्रिझ पर्यंत पोहोचला होता मात्र वढेरा धाव घेण्यास तयार नव्हता. शेवटी चेंडू जेव्हा जास्तच दूर गेला त्यावेळी त्याने धाव पूर्ण केली. (Arjun Tendulkar Six Video)
अर्जुन तेंडुलकरने बॅटने दिले उत्तर..
नेहाल वढेरा आपल्याच संघातील खेळाडूंना कमी लेखण्याचा प्रयत्न करत होता. २ चेंडू खेळून तो स्वतः देखील बाद होऊन माघारी परतला. त्याने २१ चेंडूंचा ४० धावांची खेळी केली. मात्र अशा वागण्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
नेहालला स्ट्राइक हवी होती त्यामुळेच तो अशा चुका करत होता. मात्र अर्जुनला संधी मिळताच त्याने दाखवून दिलं की, मी देखील फलंदाजी करू शकतो. त्याने २० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर वरिष्ठ गोलंदाज मोहित शर्माच्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत षटकार मारला. (Latest sports updates)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर डेव्हीड मिलरने ४६ आणि अभिनव मनोहरने ४२ धावांची खेळी केली.
या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी बाद २०७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेहाल वढेराने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर ग्रीनने ३३ धावांची खेळी केली. मुंबईला या डावात ९ गडी बाद १५२ धावा करता आल्या. या सामन्यात मुंबईला ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.