Arjun Tendulkar Saam TV
क्रीडा

Arjun Tendulkar: क्रिकेटपेक्षा हे खेळ अर्जुन तेंडुलकरला जास्त आवडायचे, सचिनने स्वत: दिली होती माहिती

साम टिव्ही ब्युरो

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात शानदार शतक साजरं केलं आहे. अर्जुनने आज गोव्याच्या संघाकडून रणजीमध्ये पदार्पण केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच सामन्यात 178 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केले. मात्र अर्जुन तेंडुलकरचं आवड क्रिकेट नव्हती, असं स्वत: सचिन तेंडुलकरने सांगितलं होतं.

सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अर्जुन तेंडुलकरसाठी क्रिकेट हे पहिलं प्रेम नव्हतं, पण तो सुरुवातीला बुद्धिबळ आणि फुटबॉल खेळायचा. मात्र अर्जुन तेंडुलकरने गेल्या काही वर्षात आपली आवड क्रिकेटमध्ये निर्माण केली असल्याचं आज दिसलं आहे.  (Latest Marathi News)

सचिन तेंडुलकरनेही या मुलाखतीत आणखी एक गोष्ट संगितली होती की अर्जुन तेंडुलकरच्या समोर त्याला खेळताना पाहित नाही. याचं कारण सांगताना सचिनने म्हटलं की, जेव्हा पालक आपल्या मुलाला खेळताना पाहतात तेव्हा त्याचा त्यांच्यावर दबाव वाढतो.

मला कोणी खेळताना पाहू नये अशी माझी देखील इच्छा असायची. त्याचा खेळ बघायला गेलो तरी कुठेतरी लपून राहीन आणि अर्जुनला कळणार नाही की मी तिथे आहे, असंही सचिनने सांगितलं. (Sports News)

सचिननेही पदार्पणात ठोकलं होतं शतक

सचिन तेंडुलकरने डिसेंबर 1988 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून खेळताना सचिनने गुजरातविरुद्ध शतक झळकावले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला आणि रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने 129 चेंडूत शतक झळकावले. 100 धावा करुन तो नाबाद राहिला होता. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT