Arjun Tendulkar
Arjun TendulkarSaam TV

Arjun Tendulkar: अर्जुनची डोमेस्टिक क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी, तरीही टीम इंडियात संधी मिळणे कठीण, कारण...

चांगली कामगिरी करूनही अर्जुनला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी शक्यता कमी आहे.
Published on

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं भारतीय क्रिकेटमधील योगदान कधीही विसरता येणार नाही. आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरदेखील त्यात दिशेने वाटचाल करत आहे. अर्जुन तेंडुलकर देखील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपली जादू दाखवत आहे. अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मात्र चांगली कामगिरी करूनही अर्जुनला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी शक्यता कमी आहे. कारण भारतीय संघात आधीच उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. काय कारणं आहेत की अर्जुनला सध्या भारतीय संघात स्थान मिळणार नाही, यावर एक नजर टाकुया.  (Latest Marathi News)

Arjun Tendulkar
Arjun Tendulkar: अर्जुनच्या खेळीने चाहत्यांना सचिन तेंडुलकरची आठवण; 34 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

अर्जुनने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असूनही त्याला सध्या भारतीय संघात स्थान मिळू शकत नाही. कारण अर्जुनच्या कामगिरीचा सध्या तरी लिमिडेट आहे. त्याने पहिल्या सामन्यात शतक झळकावलं आहे, पण एका शतकामुळे त्याला लगेच टीम इंडियात जागा मिळणे सध्यातरी कठीण आहे.

अर्जुन तेंडुलकर बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजीमध्येही त्याने बॉल आणि बॅटने फटकेबाजी केली. मात्र असे असूनही त्याला सध्या भारतीय संघात खेळण्याची संधी मिळणार नाही. (Sports News)

कारण सध्या भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंची कमतरता नाही, या संघात शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, दीपक चहर या खेळाडूंचा भरणा आहे. या सर्व खेळाडूंकडे भरपूर अनुभव देखील आहे. दुसरीकडे, अर्जुनचे करिअर नुकतेच सुरू झाले असून लगेच त्याला भारतीय संघात संधी देणे घाईचे ठरेल.

Arjun Tendulkar
Arjun Tendulkar: अर्जुनची धडाकेबाज खेळी, पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यात ठोकलं शतक

रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुनने शतक साजरं केलं आहे. मात्र त्याने त्याच्या कामगिरीत आता सातत्य राखणे गरजेचं आहे. अर्जुनने त्याची कामगिरी अशीच सुरु ठेवली तर नक्कीच त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं नक्की उघडतील यात शंका नाही.

अर्जुनने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत 7 सामन्यात 7 विकेट घेतल्या, तर 7 सामन्यात त्याने फलंदाजी करत 251 धावा केल्या होत्या. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये देखील अर्जुनने बॉल आणि बॅटने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने 7 सामन्यात 131 धावा केल्या तर गोलंदाजीत 10 विकेट्स घेतल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com