arjun tendulkar saam tv
क्रीडा

IPL 2025 Auction: अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या पायावर मारला धोंडा; ऑक्शनच्या काही तास अगोदर हे काय झालं?

IPL 2025 Auction: आज आणि उद्या मेगा आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार असून शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंपैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत, ज्यामध्ये 4 असोसिएट देशांचे खेळाडू आहेत.

Surabhi Jagdish

आज आयपीएल २०२५ च्या ऑक्शनला सुरुवात होणार आहे. आज रात्री आणि उद्या जेद्दाह हे मेगा ऑक्शन होणार आहे. दोन दिवसीय मेगा लिलावासाठी 1500 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती, परंतु नवीन खेळाडूंचा समावेश करण्यापूर्वी अंतिम यादीत केवळ 574 खेळाडूंचा समावेश होता.

शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंपैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत, ज्यामध्ये 4 असोसिएट देशांचे खेळाडू आहेत. या लिलावामध्ये 320 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 12 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. दरम्यान या ऑक्शनपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.

'या' खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

या मेगा ऑक्शनमध्ये काही स्टार भारतीय क्रिकेटपटूंवरही मोठी बोली लावली जाणार आहे ज्यांना मोठी मागणी आहे. दिल्ली कॅपिटल्समधून रिलीज झालेल्या ऋषभ पंतवर यावेळी सर्वात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. गेल्या सिझनमध्ये केकेआरला चॅम्पियन बनवणारा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही यावेळी ऑक्शनमध्ये. आगामी ऑक्शनमध्ये भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलचंही नाव आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सच्या टीमने रिलीज केल्यामुळे या ऑक्शनमध्ये अर्जुनही दिसणार आहे.

एकीकडे ऑक्शनमध्ये सहभागी खेळाडू दमदार कामगिरी करतायत. या माध्यमातून लिलावात मोठी रक्कम मिळवण्याच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवण्याचा प्रयत्न खेळाडूंचा आहे. त्याचवेळी अर्जुन तेंडुलकरने ऑक्शनच्या एक दिवस आधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अत्यंत महागडा स्पेल टाकला. गोवा आणि मुंबई यांच्यातील सामन्यात अर्जुनने चार ओव्हर्समध्ये ४८ रन्स दिलेत. शिवाय यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नाही. ऑक्शनपूर्वी त्याची ही खराब कामगिरी धोकादायक ठरू शकते.

ऑक्शनमध्ये उतरलाय अर्जुन

अर्जुन तेंडुलकरच्या या कामगिरीने ऑक्शनमधील मोठ्या बोलीच्या आशांना मोठा धक्का लावलाय. आयपीएलचे फ्रेंचायझी खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीच्या आधारे टीममध्ये समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकरवर कोणती टीम बोली लावणार आणि मेगा लिलावात त्याला किती पैसे मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Rasane News : प्रत्येक मतदारासाठी मी काम करणार; आमदारकी मिळाल्यावर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया | VIDEO

Dhananjay Munde: आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली? वाचा

IPL 2025 Mega Auction Live: केएल राहुल बनला दिल्लीकर! लागली इतक्या कोटींची बोली

Maharashtra News Live Updates: शरद पवार कराड विमानतळावर दाखल, निकालावर काय बोलणार शरद पवार?

Crispy Momos: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल क्रिस्पी मोमोज, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT