टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल ऑस्ट्रेलिया टीमवर चांगलाच भारी पडलेला दिसला. पर्थमध्ये भारत विरूदध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिली टेस्ट खेळवण्यात येतेय. या सामन्यात कांगारूंच्या गोलंदाजीला धु-धु धुत यशस्वीने सेंच्युरी झळकावलीये. या सामन्यात शतक ठोकत यशस्वीने एक खास रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे.
खेळाच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने त्याचं शतक पूर्ण केलं. यावेळी त्याने थेट सिक्स लगावत शतक पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालचं टेस्ट कारकिर्दीतील हे चौथं शतक आहे. ऑस्ट्रेलियात भारतासाठी डेब्यू सामन्यात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय. एमएल जयसिम्हा आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर खेळल्या गेलेल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक करणारा तो तिसरा भारतीय ठरला.
जयस्वाल ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा चौथा सर्वात युवा भारतीय खेळाडू असून त्याने परदेशात दुसरं शतक झळकावलंय. यापूर्वी यशस्वीने वेस्ट इंडिजमध्येही शतक झळकावलं होतं. हे त्याच्या टेस्टमधील पहिलं शतक होतं.
पर्थ टेस्टमध्ये जयस्वाल पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, पण दुसऱ्या डावात त्याने उत्तम पद्धतीने कमबॅक करत शतक झळकावलंय. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं झळकावणारा तो दुसरा युवा ओपनर आहे. यावेळी एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमला मागे टाकलंय.
101 – एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन, 1967-68
113 – सुनिल गावस्कर, ब्रिस्बेन, 1977-78
126* – यशस्वी जयस्वाल, पर्थ, 2024
8 – सचिन तेंडुलकर
5 – रवि शास्त्री
4 – सुनील गावस्कर
4 – विनोद कांबळी
4 – यशस्वी जयस्वाल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.