ind vs nz twitter
Sports

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Rishabh Pant- Washington Sundar ViraL Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मजेशीर संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजसाठी आलेल्या भारतीय संघाला २५९ धावा करता आल्या आहेत. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने १ गडी बाद १६ धावा केल्या. दरम्यान न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना ७८ वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला.

त्यावेळी एजाज पटेल फलंदाजी करत होता. रिषभ पंत नेहमीच गोलंदाजीला यष्टीमागून गोलंदाजीसाठी टिप्स देत असतो. त्याने वॉशिंग्टन सुंदरलाही त्याने टिप्स दिली. चेंडू टाकण्यापूर्वी तो म्हणाला, ' फुल लेंथ आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाक.. ' वॉशिंग्टन सुंदरने असं करताच एजाज पटेलने लाँग ऑनच्या दिशेने चौकार खेचला.

चौकार मारताच रिषभला आपली चूक समजली. त्यानंतर तो म्हणाला, ' मला माहीतच नव्हतं याला पण हिंदी येते.. ' पण मुख्य बाब म्हणजे रिषभ हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बोलत होता. त्यामुळे त्याला हिंदी समजलं नसेल, पण इंग्रजी नक्कीच समजलं असेल.' रिषभच्या या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर रचिन रविंद्रने ६५ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ७ गडी बाद केले. यासह न्यूझीलंडचा डाव अवघ्या २५९ धावांवर आटोपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT