"तिरंदाज खेळाडूंचा कारखाना" बुलडाणा शहराची नवी ओळख Saam Tv
Sports

"तिरंदाज खेळाडूंचा कारखाना" बुलडाणा शहराची नवी ओळख

राज्याच्या राजधानी, उप राजधानीतील खेळाडू प्रशिक्षणासाठी बुलडाण्यात...

संजय जाधव

बुलडाणा जिल्ह्याला (Buldhana District) भौगोलिक, ऐतिहासिक आणि आध्यत्मिक वारसा लाभलेला आहे, आणि आता यामध्ये एक नवीन भर पडली आहे. बुलडाणा म्हणजे "तिरंदाज खेळाडू घडवण्याचा कारखाना" अशी नवीन ओळख बुलढाणा जिल्ह्याची निर्माण झाली आहे.

सैन्य दलातुन निवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत इलक यांनी बुलडाण्यात 2012 साली मुलांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे केवळ एक खेळाडू प्रशिक्षण घेत होता, मात्र आज रोजी संपूर्ण राज्यातील 100 पेक्षा जास्त खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहेत. या आठ वर्षाच्या काळामध्ये त्यांनी तिरंदाजीमध्ये अनेक खेळाडू तरबेज केले, ज्यापैकी आत्तापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 छत्रपती पुरस्कार मिळवलेले खेळाडू, 3 खेळाडू इंटरनॅशनल पदक विजेते, तर 43 राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू त्यांनी घडवले आहेत.

आता नुकतेच पोलंडमध्ये अमेरिकेवर मात करून तिरंदाजी टीम ने सुवर्ण मिळवून स्वातंत्र्यदिनी देशाला एक अनोखी भेट दिली आहे, या टीमचा नेतृत्व करणारा मिहीर अपार हा देखील बुलडाण्यातील असून तो प्रशिक्षक चंद्रकांत इलक यांच्याच मार्गदर्शनात तरबेज झाला आहे. प्रशिक्षक चंद्रकांत इलके आता बुलडाणा पोलीस दलामध्ये कार्यरत असून ते आपली नोकरी करून या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण देत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी इलक यांना डेपोटेशन वर क्रीडा विभागात रुजू करावे. जेणेकरून देशाच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी अनेक तिरंदाज खेळाडू निर्माण करता येतील अशी मागणी वस्तू उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.या सर्व तिरंदाज खेळाडूंना आजही स्वतःचं मैदान नसल्यामुळे बियाणे महामंडळाच्या ताब्यात असलेल्या मैदानावरच ते सराव करत आहेत... बाहेरून येणाऱ्या सर्व मुले-मुली खेळाडूंना राहण्याची आणि जेवणाची अजूनही शासनाकडून व्यवस्था नाही... त्यामुळे जिल्हा प्रशासन किंवा क्रीडा विभागाने या खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा भावनाही यावेळी खेळाडूंनी व्यक्त केल्या आहेत.

तर शासकीय जागेवर तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी क्रीडा विभागाने पावले उचलली असून, त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध झाला आहे, आणि या क्रीडासंकुलात प्राधान्याने तिरंदाज खेळाडूंसाठी मैदानाची आणि साहित्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, आणि पाच कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध झाल्यास या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची देखील सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी यांनी सांगितले आहे.

बुलडाण्या मध्ये तिरंदाज खेळासाठी अत्यंत उत्कृष्ट प्रशिक्षक लाभले असून आता प्रशासनाने या खेळाडूंना इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांना नक्कीच चालना मिळेल आणि येत्या काळामध्ये ऑलिंपिक स्पर्धेमध्ये नक्कीच हे सर्व खेळाडू देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतील यात मात्र शंका नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT