बँकॉक : तब्बल 73 वर्षांनंतर भारताने बॅडमिंटन (badminton) खेळातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा थाॅमस कप (thomas cup) जिंकल्याने देशवासियांच्या (india) आनंदाला उधाण आले आहे. समाज माध्यमातून (social media) भारतीय खेळाडूंवर अभिनंदानाचा वर्षाव हाेऊ लागला आहे. देशाचे क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर (Anurag Singh Thakur) यांनी आज भारतीय पुरुष बॅडमिंटन संघास एक कोटी रुपयांचे (Rs 1 crore to Indian men’s badminton team) बक्षीस जाहीर केले आहे. (thomas cup latest marathi news)
देशाचे क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर (Anurag Singh Thakur) यांनी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे ट्विट (tweet) करुन अभिनंदन केले आहे. तसेच संघास एक कोटी रुपयांचे पारिताेषिक जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी (prime minister narendra modi) यांनी देखील भारतीय बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आहे. माेदींनी ट्विट करुन इतिहास रचल्याचे नमूद केले. ते लिहितात भारताने थॉमस कप जिंकल्याने संपूर्ण देश आनंदित झाला आहे. या कर्तृत्ववान संघाचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा. आजचा विजय युवा खेळाडूंना प्रेरणा देईल असेही माेदींनी नमूद केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा अभूतपूर्व विजय देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असे म्हटले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.