Asia Cup 2022: आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय हाॅकी संघ जाहीर; नवाेदितांना संधी

FIH विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ यापुर्वीच पात्र ठरला आहे
indian hockey team for hero men's asia cup 2022
indian hockey team for hero men's asia cup 2022 saam tv
Published On

नवी दिल्ली : इंडोनेशियातील जकार्ता येथे २३ मे ते १ जून २०२२ या कालावधीत होणा-या आगामी हिरो पुरुष आशिया करंडक (Hero Men's Asia Cup) स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने (Hockey India) भारतीय पुरुष हॉकी संघातील (indian hockey team) २० जणांची नावे नुकतीच जाहीर केली आहेत. विश्वचषक पात्रता या स्पर्धेतील (competition) अ गटात भारत, जपान, पाकिस्तान आणि यजमान इंडोनेशिया तर ब गटात मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. (Hero Men's Asia Cup Latest News)

या संघाचे नेतृत्व रुपिंदर पाल सिंग (Rupinder Pal Singh) करणार असून उपकर्णधार म्हणून बीरेंद्र लाक्रा (Birendra Lakra) याच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. भारतीय संघात गोलरक्षक पंकज कुमार राजक, सूरज करकेरा, बचावपटू रुपिंदर पाल सिंग, यशदीप सिवाच, अभिषेक लाक्रा, बिरेंद्र लाक्रा, मनजीत, दीपसन तिर्की, विष्णुकांत सिंग, राज कुमार पाल, मरेसवरेन शक्तीवेल, शेषे गौडा बीएम, सिमरनजीत सिंग यांचा समावेश आहे. फॉरवर्ड पवन राजभर, अभरण सुदेव, एसव्ही सुनील, उत्तम सिंग आणि एस. कार्ती यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या मनिंदर सिंग आणि निलम संजीप झेस यांना बदली खेळाडू म्हणून तर पवन, परदीप सिंग, अंकित पाल आणि अंगद बीर सिंग यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

indian hockey team for hero men's asia cup 2022
Archery Asia Cup: महाराष्ट्राचे ५ तिरंदाज साधणार आशिया करंडक स्पर्धेत लक्ष्य

या संघाबाबत प्रशिक्षक बी.जे. करिअप्पा (Coach BJ Kariappa) म्हणाले, "संघ अनुभवी वरिष्ठ खेळाडू आणि नवोदित खेळाडूंचा मिळून तयार झालेला आहे. अनेकांनी वेगवेगळ्या वयोगटातील सामने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. आगामी स्पर्धेत संघ उत्तम कामगिरी करेल.

भारताचा माजी कर्णधार आणि दोन वेळचा ऑलिम्पियन सरदार सिंग (Sardar Singh) प्रशिक्षक या नात्यानेही संघासोबत असणार आहे. राष्ट्रीय शिबिरात खेळाडूंनी उत्तम सराव केला आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी त्यांची क्षमता देखील सिद्ध केली आहे. हा खेळाडूंचा एक अतिशय प्रतिभावान गट आहे आणि मी त्यांना संघात स्थान मिळवण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून खूप मेहनत करताना पाहिले आहे. आगामी स्पर्धेत देखील भारत उत्तम कामगिरी करेल असेही सिंग यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

indian hockey team for hero men's asia cup 2022
Priyanka Mohite: साता-याच्या प्रियांका मोहितेची कंजनजंगा माेहिम फत्ते
indian hockey team for hero men's asia cup 2022
Satara: वीस हजार रुपयांची लाच घेताना हवालदारास ACB ने पकडले
indian hockey team for hero men's asia cup 2022
Crime: जयभीम चौकात दोन गट भिडले; १ युवक मृत्यूमुखी, २ जखमी, १० जणांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com