Angelo Mathews Statement X (Twitter)
Sports

Angelo Mathews Statement: शाकिबचं कृत्य लज्जास्पद ! सामन्यानंतर अँजेलो मॅथ्यूज संपूर्ण संघावर गरजला,म्हणाला...

Angelo Mathews Wicket Controversy: या सामन्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Angelo Mathews On Shakib Al Hasan:

अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार आणि अँजेलो मॅथ्यूज शाकीब हसनवर भडकताना दिसून आले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना अँजेलो मॅथ्यूजने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याने शाकीब अल हसनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सामना झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज म्हणाला की, ' मी यापूर्वी शाकीब अल हसन आणि बांगलादेश संघाचा सन्मान करायचो. मात्र यापुढे असं काहीच नसेल. मी वेळ वाया घालवत नव्हतो. सर्वांना दिसलं की, मी क्रीझवर आलो होतो. पण माझ्या हेल्मेटचा बेल्ट तुटला होता. शाकीब आणि बांगलादेश संघाने केलेलं हे कृत्य लज्जास्पद आहे. अशाप्रकारचं क्रिकेट खेळणं लज्जास्पद आहे. बांगलादेश सोडून इतर कुठलाही संघ असं करेल असं मला वाटत नाही.'

' मी त्याला म्हटलं की अपील मागे घे, पण त्याने असं केलं नाही. मी वेळेवर मैदानावर आलो होतो याचा पुरावा आहे माझ्याकडे. माझ्याकडे ५ सेकंद शिल्लक होते. त्यानंतर हेल्मेटचा बेल्ट तुटला यात मी तरी काय काय करू शकतो. जरी तो फिरकी गोलंदाज असला तरी मी हेल्मेट शिवाय कसं खेळणार. जर यष्टिरक्षक हेल्मेट न घालता यष्टिरक्षण करत नसतील तर मी फलंदाजी कशी करणार.' (Latest sports updates)

काय घडलं?

तर झाले असे की, सदीरा समरविक्रमाला ४१ धावांवर बाद झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजी करण्यासाठी आला. नियमानूसार अँजेलो मॅथ्यूजला दोन मिनिटांच्या आत मैदानावर यायचं होतं. त्यानंतर तीन मिनिटात त्याला पुढील चेंडूचा सामना करायचा होता.

हा चेंडू तो खेळू शकला नाही. त्यानंतर शाकीब अल हसनने टाईमआऊटची अपील केली. त्यामुळे त्याला टाईमआऊट घोषित करण्यात आलं आहे. यासह अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा

Dussehra 2025: दसऱ्याला शस्त्राची पूजा कशी करतात?

Dombivli Shocking : झोपेत दोघींना सापाचा दंश! काल मुलीनं जीव सोडला, आज मावशीचा मृत्यू; डोंबिवलीत हळहळ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT