भारतीय संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या दोन्ही संघांकडून खेळताना त्याने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान आयपीएल स्पर्धेतून निवृत्त झाल्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये काय फरक आहे. याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
अंबाती रायुडूने आयपीएलच्या ८ हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याने ११४ सामन्यांमध्ये २४१६ धावा केल्या आहेत. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो म्हणाला की,' चेन्नईचा संघ प्रक्रियेवर अधिक भर देतो. सामन्याचा निकाल काहीही येवो त्यावरुन संघातील वातावरण बदलत नाही. मात्र मुंबई इंडियन्सचं याउलट आहे. मुंबईचा संघ केवळ जिंकण्यासाठी खेळतो. या संघातील वातावरण असंच आहे. ते नेहमी जिंकण्यासाठी मैदानात उतरतात. यात काहीच तडजोड नसते. '
तसेच तो पुढे म्हणाला की, 'सीएसके आणि मुंबई इंडियन्स संघातील वातावरण वेगळं आहे. मात्र शेवटी दोन्ही संघ प्रचंड मेहनत घेतात. माझ्या मते सीएसके संघातील वातावरण चांगलं आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी तुम्ही दिर्घ काळ खेळाल तर डोकेदुखी वाढणारच. जेव्हा मी मुंबई इंडियन्स संघासाठी खेळायचो त्यावेळी माझ्या खेळात सुधारणा झाली होती. एखाद्या सामन्यात पराभव झाल्यास तुम्हाला कारणं देता येत नाहीत. शेवटी तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावंच लागतं. मुंबई इंडियन्स संघातील वातावरण असं आहे जिथे तुमच्या कामगिरीत सुधारणा होत जाते. तर चेन्नई सुपर किंग्ज संघातील वातावरण असं आहे, जिथे तुमच्याकडून चांगली कामगिरी करुन घेतली जाते. '
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.