imane khelif twitter
Sports

Imane Khelif, Paris Olympics: 'मी महिला आहे..' पुरुष म्हणून ट्रोल होणाऱ्या इमान खलीफने पटकावलं गोल्ड मेडल

Imane Khelif Won Gold Medal: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष म्हणून ट्रोल केल्या गेलेल्या इमान खलीफने बॉक्सिंगमध्ये आपल्या देशासाठी गोल्ड मेडल पटकावलं आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेते खेळांपेक्षा इतर गोष्टींचीच अधिक चर्चा रंगली आहे. या स्पर्धेतील सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे अल्जेरियाचा बॉक्सर इमान खलीफचा. बॉक्सिंगच्या पहिल्या सामन्यापासूनच इमान खलीफ तुफान चर्चेत आहे.

महिलांच्या स्पर्धेत पुरुषांना लढण्यासाठी उतरवल्याचा आरोप इमान खलीफवर आरोपवर करण्यात आला होता.इमान खलीफने पहिल्याच सामन्यात इटलीची बॉक्सर अँजेला कारिनीचा पराभव केला होता. आता याच इमान खलीफने महिलांच्या ६६ किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

जेंडर वादाला मागे सोडत पटकावलं जेतेपद

महिलांच्या ६६ किलोग्रॅम वजनी गटात इमान खलीफने फायनलमध्ये चीनच्या यांग लियूचा पराभव केला. या सामन्यातही तिने एकतर्फी बाजी मारली. सुवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात तिनचे चीनच्या यांग लियूचा ५-० ने पराभव केला. या शानदार विजायसह ती अल्जेरियासाठी बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

अनेक अडचणींना तोंड देत पटकावलं सुवर्णपदक

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा ही इमान खलीफ मुळीच सोपी नव्हती. संपूर्ण स्पर्धेदरम्यान तिला पुरुष म्हणून ट्रोल केलं गेलं. स्टेडियममध्ये, सोशल मीडियावर तिचा पुरुष म्हणून उल्लेख केला गेला. मात्र तिचं टार्गेट सुवर्णपदक जिंकण्याचं होतं. ते तिने करुन दाखवलं आहे. ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ती भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले होते.

काय म्हणाली इमान खलीफ?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर इमान खलीफ म्हणाली की, ' गेल्या ८ वर्षांपासून ऑलिम्पिक पदक जिंकणं हे माझं स्वप्न होतं. आता मी माझं स्वप्नं पूर्ण केलं आहे.' तसेच तिने पुरुष म्टटलं जात होतं, याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली की,' ते आरोप झाल्यानंतर सुवर्णपदक पटकावणं हे माझ्यासाठी दिलासा देणारं महत्वाचं असणार आहे. आम्ही ऑलिम्पिक स्पर्धेत एक खेळाडू म्हणून इथे आलो आहोत. मला आशा आहे की, भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत असं काही होणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT